मंडळी आज आपण यूट्युब व्हिडिओ मधून mp3 गाणी वेगळी कशी करायची याची माहिती करून घेणार आहोत..बर्याच वेळा एखादा यूट्युबवर व्हिडिओ पाहताना त्यातील गाणे mp3 स्वरुपात वेगळे करून संग्रही ठेवावे अशी आपल्याला इच्छा होते...पण ते कसे करावे याची आपल्याला माहिती नसते.
हे कसे करायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)यूट्युबवर व्हिडिओ पाहताना त्यातील गाणे mp3 स्वरुपात वेगळे करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.youtube-mp3.org/
२)मग चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे यूट्युबवरील व्हिडिओचा दुवा कॉपी करून तो पेस्ट करा आणि मग convert Video या पर्यांयावर टिचकी द्या.
३)असे केल्यावर Video successfully converted to mp3 असा संदेश दिसेल आणि एक डाऊनलोड पर्यांय दिसेल.
४)त्यावर टिचकी द्या आणि त्या व्हिडिओ मधले गाणे संगणकावर जतन करा.
आहे की नाही हे सोप्पे...करून बघा :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
thank u very much !!!
ReplyDelete