मंडळी आता बहुतेक जण सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करतात,त्यात जगभरातील मित्र-मैत्रिणी जोडण्याची सोय असली तरी हे जग भ्रामक आहे...बहुतेक वेळा एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला तरी त्या बद्दल फेसबुक सारख्या साईट वर इतरांना ते लवकर कळत नाही. कारण फेसबुक खाते तुमच्या मृत्यु नंतर आपोआप रद्द होत नाही. मग अशी काही सोय आहे का की तुमच्या मृत्यु नंतर तुमचा शेवटचा संदेश तुमच्या फेसबुक फलकावर आपोआप जाईल.
हो तशी सोय आता झालेली आहे...ती देखिल एका फेसबुक ऍप च्या मुळे.ifidie चा वापर करून ते आपण सहज करू शक्तो.
हे कसे कराल?
२)या नंतर याचा वापर करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
३)आता त्या apps ला परवानगी देण्यासाठी allow वर टिचकी द्या.
४)पुढील पानावर तुम्हाला तुमच्या मृत्यूनंतर जो शेवटचा संदेश द्यायचा असेल तो द्रुकश्राव्य अथवा लिखित स्वरुपात द्यावा लागेल त्यासाठी Leave a video message अथवा Leave a text message पर्यांयाचा वापर करा.
५)त्या नंतर तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारातील ३ व्यक्तींची तुम्हाला Trustees म्हणजे तुमच्या मृत्युच्या बातमीची खात्री करून देणारे म्हणून निवड करावी लागेल.तुमच्या कुटूंबातील व्यक्तींची तुम्ही यासाठी निवड करू शकता. तुमच्या मृत्युची या तिघांकडून शहानीशा झाल्यावरच तुमचा शेवटचा संदेश तुमच्या मृत्युनंतर तुमच्या मित्रपरिवाराच्या भित्तीफलकावर कळवला जाईल.
६)तुमच्या मृत्युनंतर तुमचा शेवटचा संदेश फेसबुक मित्रपरिवाराला कळवायचा हा सोप्पा मार्ग आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेले चलचित्र तुम्ही पाहू शकता
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment