मंडळी तुम्हाला याची कल्पना असेल की फेसबुक वर तुम्हाला चाहत्यांचे अथवा तुमच्या कंपनी,व्यवसाया संबंधीचे पान तयार करता येते.ज्याना याची माहिती नसेल त्यांनी खाली दिलेल्या दुव्यावरचा लेख वाचावा.
तुमच्या अनुदिनीचे(Blog चे) फेसबूक वरचे पान कसे तयार कराल?
आता तशीच सेवा गुगल + या सोशल नेटवर्किंग साईटने देवू केली आहे.आज आपण गुगल + वर हे पेज कसे तयार करायचे याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)यासाठी प्रथम तुमच्या गुगल + खात्यावर लॉग-इन व्हा.
२)त्यानंतर खाली दिलेल्या दुव्यावर जा.
https://plus.google.com/pages/create
३)जे पान उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल.
४)यातील Pick a category पर्यांयातून योग्य त्या पर्यांयाची निवड करा.
५)ब्लॉग साठी पान बनवायचे असेल तर Arts,Entertainment or Sports पर्यांय निवडा आणि खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व माहिती भरा.
६)सर्व माहिती भरून झाल्यावर CREATE पर्यांयावर टिचकी द्या.
७)पान तयार झाल्यावर पुढील पायरी वर Customise your page's public profile पर्यांय दिसेल त्यात आवश्यक बाबींची पुर्तता करा आणि पुढील पायरी वर जा.
असे केल्याने तुमचे गुगल+ वरचे पान तयार होईल.
८)प्रात्यक्षिक पाहण्यासाठी खाली दिलेल्या सोबतच्या गुगल + पानवर जा.
https://plus.google.com/b/114304024452145161805/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment