मंडळी आज ११.११.११ तारीख,...सकाळ पासून तुमच्या आयुष्यात येणारी तारीख,परत हा दिवस येणार नाही.काहीतरी आठवणीत राहिल असे करा असे संदेश मोबाईल वर येवून गेले, तर काही जणांनी ११-११-११ च्या ११ वाजुन ११ मिनिटांसाठी शुभेच्छा देवू केल्या.मिडियावाल्यानी तर लग्नाची घाई पासून जुळ्यांचा जन्म या पर्यंत बातम्यावर चर्चा केली.अभ्यासकांनी तर या दिवसाची कोणतीही वेळ शुभ नाही असे मत नोंदवूनही टाकले.
मग मनात विचार आला की खरच एखादे विशेष कार्य करण्य़ासाठी तारीख,वेळ महत्त्वाची मानायची का?
तसे असेल तर आज एखाद्या मुलीला मागणी घालणार्या मुलाला,जर तिने होकार दिला तर त्याच्या साठी तो शुभ मुहुर्त मानावा लागेल..आणि नकार दिला तर त्याच्या तो कायम लक्षात राहणार कारण ११.११.११,अभ्यासक म्हणतील दिवस शुभ नव्हता रे बाबा.
मग शेवटी ठरले की११.११.११ आले,आता पुढील वर्षी १२.१२.१२ च्या मुहुर्ताला १२ वाजुन १२ मिनिट १२ सेकंदाना काय करायचे ते ठरवून ठेवावे लागेल :D
मिडियावाल्यानी आतापासुन बातमी तयार करून ठेवावी..म्हणजे तो संपुर्ण दिवस त्या बातमीवर काढता येईल. उदा. १२.१२.१२ च्या मुहुर्ताचे औचित्य साधून," मला जावू द्याना घरी आता वाजले की १२." हे गाणे १२ वाजता वाजवण्यात आले.
माझ्या मित्राने तर १२ महिने में १२ तरिकेसे या गाण्यावर नाचू या असे ठरवून ही टाकले.
शेवटी तारीख,महिनी,वर्षे ,वेळ कोणतीही असो ती आठवणीत राहावी असे कार्य करणे आपल्या हातात असते...त्यासाठी अश्या विशेष मुहुर्तांची गरज नसावी, नाही का? :-)
धिंकचिका धिंकचिका धिंकचिका धिंकचिका
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment