५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा घरातला प्रिंटर इंटरनेट वर शेअर कसा कराल?

मंडळी आज आपण तुमचा घरातला प्रिंटर इंटरनेट वर शेअर कसा करायचा याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

१)यासाठी आधी एक प्रिंटर तुमच्या घरातल्या संगणकाशी जोडलेला असला पाहिजे



२)आता तो इंटरनेट वरून तुमच्या मित्र-परिवारासोबत शेअर करण्यासाठी
Google Chrome उघडा..मग Tools –> मध्ये जा आणि मग Options-->> मध्ये Under the Hood  मधून Google Cloud Print पर्यांयातील sign-in to Google Cloud Print पर्यांयाची निवड करा..यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचे नाव आणि पासवर्ड वापरून लॉग-इन करावे लागेल.


३)Finish printer registration पर्यांयाची निवड केल्यावर तुमचा प्रिंटर Google Cloud Print च्या माध्यमातून इंटरनेट वरून वापरणे शक्य होईल.

४)आता Manage your Printers मध्ये जावून Printers option पर्यांयाची निवड करा आणि मग ज्या प्रिंटरला शेअर करायचे असेल त्याचे  नाव निवडा.

५)Share button टिचकी द्या आणि तुमच्या मित्राचा इपत्ता देवून तो प्रिंटर शेअर करा.

प्रिंटिंग कशी कराल?

१)आता तुमच्या ज्या मित्राला तुमचा प्रिंटर वापरायचा असेल त्याने त्याच्या गुगल खात्याचा वापर करून Google Cloud Print  मध्ये प्रथम लॉग-इन व्हावे.त्यासाठी या दुव्याचा वापर करावा  http://www.google.com/cloudprint/

२)shared printer चा स्विकार करावा.

३)मग त्यांना Cloud Print website वर एक मोठे Print  बटन दिसेल त्यावर टिचकी द्यावी.


४)हवी ती फाईल अपलोड करून हवी ती फाईल प्रिंट करण्यास द्यावी.

५)जेव्हा फाईल प्रिंट होईल तेव्हा पुढच्या काही सेकंदामध्ये नविन print job  दिसेल.

आहे की नाही हे अगदी सोप्पे? करून बघा..खरच सोप्पे आहे

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment