५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमची स्वत:ची ऑनलाईन टिव्ही चॅनलची साईट कशी सुरु कराल?

मंडळी या आधीच्या एका लेखामध्ये आपण तुमचे स्वत:चे ऑनलाईन रेडिओ स्टेशन कसे सुरु करायचे याची माहिती घेतली होती..ती तुम्हाला या दुव्यावर वाचता येईल.
स्वत:चा रेडियो कसा broadcast कराल ?
आज आपण "तुमची स्वत:ची ऑनलाईन टिव्ही चॅनलची साईट कशी सुरु कराल ? याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

्विशेष सुचना: हे करण्यासाठी वेब-डिजायनिंगची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे..नसेल तर दिलेल्या पद्धतीचा योग्य रीतीने अवलंब केला तर सहज जमेल
१) प्रथम तुम्हाला एक वेबसाईट डोमेन आणि वेब होस्टिंग खाते लागेल जे PHP 5 आणि Mysql 5 ला पाठिंबा देते.
फ्री वेब होस्टिंग खाते कसे मिळवायचे हे आपण आधी एका लेखात पाहिले आहे..त्याचा वापर करावा.

२)आता खाली दिलेल्या दुव्यावरून स्क्रिप्ट डाऊनलोड करा.
tvpc script


३)आता ही स्क्रिप्ट  तुमच्या वेब होस्टिंग खात्याच्या public html फोल्डर मध्ये अपलोड करून अनझीप करा.

४)मग वेब होस्टिंग खात्याच्या control panel मध्ये जावून  MySql Databases पर्यांयाची निवड करा आणि एक डेटाबेस तयार करून घ्या..हे कसे करायचे ते आधीच्या वर्डप्रेस ब्लॉग कसा होस्ट करायचा या लेखात लिहिले आहे..अनुक्रमणिका पहा .

५)या नंतर वेब होस्टिंग खात्याच्या control panel मध्ये PhpMyAdmin  मध्ये जावून import पर्यांयाचा वापर करा 

आणि  

File to import" समोरील  Browse button  वर टिचकी देवून sql.txt  तुम्ही मघाशी डाऊनलोड केलेल्या tvpc_script मधून import करा.

६)आता config.php मध्ये जा ती खालील प्रमाणे दिसेल.

$email="[email protected]";

// Database info
$dbhost="localhost"; // Should not need to alter
$dbuser=""; // <- DB Username
$dbpass=""; // <- DB Password
$dbname=""; // <- DB Name

या ठिकाणी तुमच्या डोमेनचा इपत्ता तसेच
मघाशी तुम्ही जो डेटाबेस तयार केला त्याचे नाव,युजरनेम आणि पासवर्ड टाकून केलेले बदल सेव्ह(जतन)करा.
मग तो अश्या प्रकारे दिसेल.

$email="[email protected]";

// Database info
$dbhost="localhost"; // Should not need to alter
$dbuser="tv"; // <- DB Username
$dbpass="tv"; // <- DB Password
$dbname="tv"; // <- DB Name

बस इतके झाले की तुमचे डोमेन नेम वेब ब्राउजर मध्ये टाईप करा आणि ऑनलाईन टिव्ही चॅनेल्सचा आनंद घ्या.

 अवघ्या १० मिनिटात तुम्ही असे करू शकता.
करून बघा...गुगल ऍडसनच्या जाहिराती ठेवून तुम्ही या द्वारे उत्पन देखिल मिळवू शकाल.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

4 comments:

  1. हे छान आहे पण किंचित डोक्यावरून गेलंय म्हणून दोन भाबडे प्रश्न:
    १. हे ब्लॉगस्पॉटवर करता येईल का?
    २. http://www.indiagetonline.in/ वर एक वर्षासाठी फ्री डोमेन आहे. तिथे याचा वापर करता येईल का?

    ReplyDelete
  2. नमस्कार प्रशांतजी,
    अतिशय माहितीपूर्ण पोस्ट!

    ब्लॉगच्या टेम्प्लेटबद्दल माझी एक शंका आहे

    मी जेव्हा माझा ब्लॉग http://swingsofmind.blogspot.com/ माझ्या कॉम्प्युटरवर बघते, तेव्हा माझ्या ब्लॉगचे टेम्प्लेट स्क्रीनच्या मध्यभागी दिसते व त्याच्या दोन्ही बाजूंना पांढर्‍या रंगाचे रूंद उभे पट्टे दिसतात. हे माझ्या ब्राऊजरच्या विशिष्ट सेटींग्जमुळे दिसते. मी जर ब्राऊजरचे सेंटींग फिट टू स्क्रीन केले, तर हे पांढरे पट्टे एकदम अरूंद झालेले दिसतात व ब्लॉगचे टेम्प्लेट पसरट दिसते. मला माझ्या कॉम्प्युटरचे व ब्राऊजरचेही सध्याचे स्क्रीन रिझोल्युशन बदलायचे नाहीये. तरी हे बाजूचे पांढरे पट्टे घालवण्यासाठी ब्लॉगच्या एचटीएमएल टेम्प्लेट मध्ये काय बदल करावे लागतील? ब्लॉगची बॅकग्राऊंड बदलावी लागेल का? की नुसता कलर कोड बदलून हे पांढरे पट्टे घालवता येतील?

    कृपया या बद्दल ब्लॉग पोस्ट लिहून मार्गदर्शन करावे, ही विनंती.

    ReplyDelete
  3. नाही हे ब्लॉगस्पॉट वर करता नाही येणार..कारण ब्लॉगस्पॉट वर php सपोर्ट नाही..हे तू मोगरा फुलला वर सब डोमेन बनवून सुद्धा करू शकतेस,त्यासाठी स्वतंत्र डोमेन नेम ची गरज नाही..उदा. http://www.mogaraafulalaa.com/pctv आणि सबडोमेन असेल http://pctv.mogaraafulalaa.com
    hostgator+google चा http://www.indiagetonline.in प्लॅन चांगला आहे..पण privacy protection नाही आहे..म्हणजे डोमेन कोणाचा मालकीचे आहे ते लपविता येत नाही..privacy protection साठी वेगळे $10 द्यावे लागतात.यावर सोप्पा उपाय bigrocks कडून ९९ रुपयात डोमेन मिळेल...कुपन कोड असेल तर ते ६० ते ८० रुपयांना मिळेल.privacy protection फ्री आहे.. +फ्री होस्टिंगसाठी host1free.com चा वापर करू शकतेस.

    ReplyDelete
  4. @DD>>यासाठी तुला ब्लॉगच्या css मध्ये बदल करावे लागतील.width,height,margin % मध्ये बदल करून बघ.

    ReplyDelete