मंडळी बर्याच जणांची अशी तक्रार असते की त्यांना त्यांच्या ब्लॅकबेरी मोबाईल वर हिंदी/मराठी लिखाण दिसत नाही..मग यावर उपाय काय? ते लिखाण कसे वाचता येईल?
त्याचीच माहिती आज आपण करून घेणार आहोत.
हे कसे शक्य कराल?
१)हे शक्य करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा
http://bbsak.org/
आणि तिथून BBSAK v1.9.11 ही सेटाअप फाईल डाऊनलोड करून घ्या.
२)फाईल डाऊनलोड झाल्यावर त्या वर टिचकी द्या आणि तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.
३)या नंतर तुमच्या संगणकाच्या पडद्यावर BBSAK नावाचे आयकॉन दिसेल त्यावर टिचकी द्या.(तुमचा मोबाईल संगणकाला जोडायला विसरू नका.)
४)यानंतर प्रोग्राम कडून पासवर्डची विचारणा केली जाईल.असेल तर द्या नसेल तर ती जागा तशीच रिकामी ठेवा आणि ओके वर टिचकी द्या.
५)असे केल्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे BBSAK ची विंडो उघडेल.
६)आता Modify CODs वर टिचकी द्या मग Install COD(S) पर्यांयाचा वापर करा.
७)COD इनस्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावरून net_rim_font_indic.cod डाऊनलोड करून घ्या
आणि तो तुमच्या मोबाईलमध्ये इनस्टॉल करा.
http://www.4shared.com/file/X7vIvrFi/net_rim_font_indic.html
(हे COD फकत OS 6 असलेल्या फोन वर काम करते. OS ५ असलेल्या फोनवर हे काम करत नाही.)
८)असे केल्याने तुम्हाला तुमच्या ब्लॅकबेरी मोबाईलवर हिंदी,मराठी वाचता येईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment