मंडळी गुगलची गुगल बज ही सेवा आता बंद होणार आहे..असे झाले तर या नंतर तुम्हाला नविन पोस्टमध्ये गुगल बज या सेवेचा वापर करता येणार नाही...पण तुम्ही या आधी गुगल बज द्वारे पोस्ट केलेले सर्व लिखाण दोन पद्धतीचा वापर करून तुम्ही पाहू शकता.
१)तुमच्या गुगल प्रोफाईलवर=त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://profiles.google.com/me
२)तुमच्या सर्व पोस्टचा बॅक-अप घ्या.त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.google.com/takeout
तुमचे गुगल खात्याचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग-इन व्हा.
मग जे पान उघडेल त्यावर खालील पर्यांय दिसतील,
त्यातील
Takeaway समोरील Choose services पर्यांया समोर टिचकी द्या.मग Select a service: मध्ये buzz वर टिचकी द्या.
या नंतर CREATE ARCHIVE पर्यांय निवडा.असे केल्याने तुमच्या buzz वरील पोस्टची डाऊनलोड करण्याजोगी प्रत तयार होईल.
डाऊनलोड पर्यांयावर टिचकी द्या आणि गुगल कडून डाऊनलोड सुरु होण्याआधी खात्याच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा पासवर्ड विचारला जाईल.तुमच्या खात्याचा पासवर्ड दिल्या नंतर तुमच्या buzz ची बॅकअप प्रत तुम्ही तुमच्या संगणकावर उतरवून घेवू शकाल.
या पद्धतीचा वापर करून तुम्ही गुगलच्या खात्याचा संपुर्ण बॅक-अप तुमच्या संगणकावर घेवू शकता.
त्यासाठी Takeaway समोरील All of your data पर्यांय निवडून CREATE ARCHIVE पर्यांयावर टिचकी द्या आणि या आधी जसे डाऊनलोड केले तसेच संपुर्णं डेटा तुमच्या संगणकावर डाऊनलोड करून घ्या.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
Dhanyvaad, mala hee mahiti havich hoti.
ReplyDeleteआभारी आहे :-)
ReplyDelete