मंडळी आता ऑनलाईन-ऑफलाईन मराठी लिहिणे झाले खुपच सोप्पे,अनेक वेळां मला विचारले जाते की ऑनलाईन-ऑफलाईन मराठी मध्ये कसे लिहावे...आता तर हे खुपच सोप्पे झाले आहे त्यासाठी असलेल्या विविध पद्धती पैकी सर्वांत सोप्पी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.जर तुम्हाला ऑफिस मध्ये असताना मराठी मध्ये लिहायचे असेल तर सर्वांत सोप्पा मार्ग आहे ...google transliteration चा वापर करणे.त्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
आणि मराठी भाषेची निवड करून मराठी मध्ये लिहायला सुरुवात करा,
mhanaje>>>>म्हणजे जे तुम्ही इंग्रजी मध्ये लिहाल ते मराठी मध्ये उमटेल मराठी मधून लिहिताना मध्ये इंग्रजी शब्द वापरायचे असतील तर "Ctrl+ g " या दोन्ही की एकत्र दाबा.
समजा तुम्हाला तुमच्या घराच्या संगणकावर मराठी ऑनलाईन-ऑफलाईन लिहायचे असेल तर प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा .
तिथे चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणेNew!
Download Google Transliteration IME
पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.
जे पान उघडेल त्यावर खालील चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे choose your IME language मधून मराठीची निवड करा.मग download google IME वर टिचकी दया.
असे केल्याने एक छोटा googlemarathiinputsetup.exe प्रोग्राम डाउनलोड होईल...तो डाउनलोड झाल्यावर त्या googlemarathiinputsetup.exe फाईलवर टिचकी दया आणि तो प्रोग्राम तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.एकदा ही नीट पार पडली की तुमच्या संगणकावर EN असे चिन्ह दिसले त्यावर टिचकी दया.
आणि मराठीची निवड करून मराठी मध्ये लिहायला सुरुवात करा. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment