५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या Android मोबाईल वर मराठी/हिंदी लिखाण कसे वाचाल?

मंडळी मागच्या भागात आपण तुमच्या ब्लॅकबेरी फोन वर मराठी/हिंदी लिखाण कसे वाचाल? याची माहिती घेतली. माझ्या अनुदिनीचे वाचक बिपिन यांनी मला Android मोबाईल वर ते कसे शक्य होईल? या बाबत विचारणा केली.त्याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

 हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या Android मोबाईलमध्ये काही बदल करावे लागतात,तरच तुम्ही तुमच्या मोबाईल वर नविन गोष्टी समाविष्ट करू शकता, त्याला तुमचा मोबाईल फोन Root करणे असे म्हणतात.

जर तुम्हाला याची नीट माहिती नसेल तर हे कसे करायचे याची माहिती असलेल्या व्यक्तीची मदत घ्या. अथवा गुगल वर How to root android mobile? या बाबत माहिती



शोधा आणि त्या प्रमाणे करा अथवा खाली दिलेले चलचित्र पहा.




 तुमचा मोबाईल रूट करण्यासाठी लागणारे apps प्रथम खाली दिलेल्या दुव्यावरून डाऊनलोड करून घ्या.

http://www.unstableapps.com/apps/EasyRoot.apk 

 आणि ते रन करून तुमचा मोबाईल रूट करा.
असे केल्याने तुमच्या मोबाईल मध्ये कोणतेही बदल करण्यासाठी तुम्ही सुपरयुजर बनता.

 यानंतर खाली दिलेल्या दुव्यावरून ES File Explorer डाऊनलोड करा आणि इनस्टॉल करा.

https://market.android.com/details?id=com.estrongs.android.pop

 एकदा का ते इनस्टॉल झाले की तुम्हाला Root Explorer सुरु करावे लागेल.

 ते करण्यासाठी ES File Explorer उघडा,

मग settings –> मध्ये जा आणि Root Explorer समोर टिचकी द्या तसेच Mount File System समोर सुद्धा टिचकी द्या.

असे केल्याने तुमच्या मोबाईलच्या सिस्टीम मध्ये बदल करणे तुम्हाला शक्य होईल.

 आता खाली दिलेले फॉन्ट डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलच्या /system/font/ डिरेक्टरी मध्ये सेव्ह करा.

 १)http://www.megaleecher.net/uploads/DroidHindi.ttf 

२)http://www.megaleecher.net/uploads/DroidSansFallback.ttf 

 यानंतर तुमचा मोबाईल Reboot करा आणि तुमच्या Android मोबाईल वर मराठी/हिंदी लिखाण,इसंदेश वाचण्याचा आनंद घ्या.

 धन्यवाद,
 तुमचा मित्र,
 प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

8 comments:

  1. Android वर मराठी/हिंदी लिखाण कसे करायचे ह्या बद्दल माहिती असेल तर नक्की लिही.

    ReplyDelete
  2. easy root हे विकत घ्यावे लागते असे दिसतेय. एखादी मोफत प्रणाली उपलब्ध आहे का?

    ReplyDelete
  3. रूट करण्यासाठी हे फ्री आहे..
    http://www.4shared.com/file/LqXFPN_Z/z4root130.htm

    २)Astro File Manager चा वापर ES File Explorer च्या ऎंवजी केला तरी चालेल
    http://www.4shared.com/file/q_5KhE6F/astro_file_manager_20.htm

    बाकी कसे करायचे ते चित्रफितीमध्ये दाखविले आहे.

    ReplyDelete
  4. आपली ही साईट खूप छान आहे. मी नेहमी येथे चक्कर मारीत असतो. मला जरा तुमची मदत हवी आहे, मला हे सांगा कि आपण फेसबुक वर जेव्हा इमेज\फोटो टाकतो तेव्हा त्या इमेज\फोटोवर मराठी फोंट मध्ये कसे लिहावे? म्हणजे मी माझ्या मित्राच्या वाढदिवसानिम्मित एक सुन्दरचे गुलाब फुल चा फोटो त्यावर "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जितेन जोशी" असे मराठी फोंट मध्ये कसे लिहायचे? मी मराठी लिहिण्यासाठी Google transliteration वापरतो.

    ReplyDelete
  5. त्यासाठी तुम्हाला फोटोशॉपचा वापर कसा करावा याची माहिती असणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  6. अवघे मराठी साहित्य विश्व आता ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ तंत्रज्ञानाच्या मोबाईलवर सामावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, ‘साहित्य चिंतन’ने उपलब्ध करून दिलेल्या मराठी बुक रिडरमुळे आता मराठी कादंबरी, कविता, कथा, लेख, साप्ताहिक, मासिक असे सर्व प्रकारचे मराठी साहित्य ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ तंत्राच्या मोबाईलवर वाचता येता येणार आहेत.

    साहित्य चिंतनचे हे मराठी बुक रीडर ‘गुगल’च्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड’ मार्केटवर डाऊनलोड करता येऊ शकेल. http://market.android.com/details?id=sahityachintan.android.pdfview
    तसेच मराठी बुक्स तुम्ही साहित्यचिंतन मोबाईल डाऊनलोडच्या पानावर डाऊनलोड करू शकाल. http://sahityachintan.com/marathi-book-reader-free-book

    ReplyDelete
  7. @Chetankumar Akarte माहिती बद्दल धन्यवाद :-)

    ReplyDelete