मंडळी आज पासुन मी माझ्या अनुदिनीवर मराठी मधून PHP शिका या मालिकेला सुद्धा सुरुवात करत आहे.PHP चा वापर केल्याने तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये काही अद्यवत गोष्टी समाविष्ट करू शकता.सुरुवात अगदी जुजबी गोष्टींनी करून काही काळातच तुम्हाला PHP चा संपुर्ण वापर करणे यामुळे शक्य होईल.तुम्हाला त्यासाठी HTML ची माहिती असणे गरजेचे आहे..."मराठी मधून वेबडिजायनिंग शिका" मध्ये तुम्ही HTML चा वापर कसा करायचा ते शिकणार आहात...ज्यांना HTML ची माहिती आहे त्यांच्यासाठी ही मालिका आहे.
तुम्हाला यासाठी text editor ची गरज लागेल...नोटपॅडचा वापर यासाठी तुम्ही करू शकता.
Start > Programs > Accessories > Notepad मध्ये जावून तुम्ही त्याचा वापर करू शकता.
PHP ही सर्वर साईड टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे वेब-ब्राऊजर कोणताही असला तरी चालेल..PHP कोड रन करण्यासाठी सर्वरची गरज पडू शकते...ही गरज तुम्ही XAMPP तुमच्या संगणकावर प्रस्थापित करून पुर्ण करू शकता. ते कसे करायचे ते खालील दुव्यावर तुम्हाला वाचता येईल..."XAMPP प्रस्थापित करण्यासाठीच्या पायर्या"
अथवा फ्री वेबहोस्टिंग ज्यावर तुम्ही php वापरू शकता त्याचा वापर करावा..ती कशी मिळवायची ते तुम्ही खाली दिलेल्या दुव्यामध्ये वाचू शकता.
मोफत वेब-होस्टिंग कशी मिळवाल?
PHP म्हणजे काय?
PHP म्हणजे personal home page आणि यालाच PHP: Hypertext Preprocessor असे ही बोलले जाते.PHP ही एक ओपन सोर्स टेक्नॉलॉजी आहे.हे पान ".php " चा वापर करून सेव्ह करावे लागते. उदा. page.php
साध्या वेबपाना मध्ये जे HTML कोड वापरलेले असतात ते आपण वेब ब्राउजर मध्ये View Page source करून पाहू शकतो. पण php चा वापर केल्यामुळे वापरले गेलेले कोड हे सर्वर वर कार्य करत असल्यामुळे कोणाला सहजासहजी कळत नाहीत.
याचा अर्थ page.php हे असे पेज असते ज्यात काही HTML टॅग्स आणि scripts ज्या वेबसर्वर वर रन होतात त्यांचा वापर केलेला असतो.
ही झाली phpची थोडक्यात माहिती..पुढच्या भागात आपण तुमचे पहिले php पेज कसे तयार करायचे याची माहिती घेवू.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

JAVA badal pan thoda liha.tumachi site khup changali ahe
ReplyDeleteJAVA badal pan liha na?
ReplyDelete