मंडळी आज आपण ब्लॉगवर ".pdf" अथवा ".doc" फाईल कश्या अपलोड करायच्या याची माहिती करून घेणार आहोत.असे केल्याने त्या तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये समाविष्ट करता येतील आणि तिथूनच पाहता येतील.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
२)जे पान उघडेल त्यावरील SIGN UP पर्यांयावर टिचकी द्या.
३)मग चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे जे पान उघडेल त्यात सर्व माहिती भरा.
४)मग अपलोड पर्यांयाचा वापर करून तुम्हाला हवी ती ".pdf" अथवा ".doc" फाईल अपलोड करा असे करताना तुम्हाला कॉपीराईट विषयीची विचारणा केली जाईल..हे तुमचेच साहित्य आहे याची खात्री असेल तर ओके वर टिचकी द्या.
५)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे योग्य ती माहिती भरून झाल्यावर save करा..तुमचे साहित्य "खाजगी" ठेवायचे की "सार्वजनिक" करायचे ते ठरवण्यासाठी Public अथवा Private पर्यांयाची निवड करा.
६)अपलोड पुर्ण झाल्यावर त्या फाईलच्या दुव्यावर टिचकी द्या..तळाला तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे मेनूबार दिसेल त्यामधील embed पर्यांयाची निवड करा..चित्र पहा.
७)आता दिसणार्या पर्यांयापैकी embed वर टिचकी द्या.
८)Embed this document मधील html5 टॅग खालील कोड कॉपी करून घ्या.
९)आता तुमच्या ब्लॉगर खात्यावर जा आणि नविन पोस्ट तयार करा
१०)पोस्ट लिहिताना EDIT HTML मध्ये जा आणि पायरी क्रमांक ८)मध्ये जो कोड कॉपी केला होता तो तिथे पेस्ट करा.
११)मग preview टॅग वर टिचकी द्या आणि सर्व योग्य प्रकारे झाले आहे याची खात्री झाल्यावर तुमचे लिखाण publish टॅग वर टिचकी द्या आणि प्रकाशित करा.
प्रात्यक्षिक खाली दिलेले आहे.
Netaaksharee 28 June 10-Prashant Redkar
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment