मंडळी बर्याच वेळा इंटरनेट वरून वेबसाईट पाहताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल,ती म्हणजे काही वेबसाईट तुमच्या संगणकावरून उघडत नाहीत..कारण त्या तुमच्या देशाच्या,प्रदेशाच्या विभागासाठी ब्लॉक केलेल्या असतात.अथवा फेसबुक,ऑर्कुट सारख्या साईट सुद्धा काही ठिकाणी ब्लॉक असतात.इंटरनेट प्रॉक्सीचा वापर करून आपण या वेबसाईटचा वापर सहज करू शकतो.
हे कसे कराल?
१)हे करण्यासाठी तुमच्या संगणकावर फायर-फॉक्स ब्राउजर प्रस्थापित असला पाहिजे.
२)या नंतर खाली दिलेल्या दुव्यावर जा.या दुव्यावर तुम्हाला proxy-list मिळेल.
proxy-list
ही यादी म्हणजे इंटरनेट वरील मोफत प्रॉक्सींची यादी असते.(चित्र पहा)
या चित्रा मध्ये तुम्हाला विविध पर्यांय दिसत आहेत.
Last update IP address Port Country Speed Connection time Type Anonymity
त्यातले IP address ,Port,Type हे आपल्याला उपयोगात आणायचे आहेत.Type मध्ये HTTPS असलेल्या IP address ,Port ची निवड करा.याचा वापर केल्याने तुमच्या इंटरनेट कनेक्शनचा IP address आपोआप लपवला जाईल.
याचा वापर करण्यासाठी फायर-फॉक्स ब्राउजरच्या मेनूबार मधील
Tools>>Options>>Advanced>>Network मध्ये जा.
३)आता Configure how firefox connects to the Internet समोरील Settings पर्यांयावर टिचकी द्या.
४)आता जी विंडो उघडेल त्यातील Manual proxy configuration ची निवड करा.मग HTTP Proxy: समोरील जागेत याआधी यादीमधून निवडलेला IP address टाईप करा... Port समोर त्या IP address सोबत असलेल्या Port टाईप करा.मग Ok वर टिचकी द्या.
५)असे केल्याने तुम्ही आता कोणतीही ब्लॉक केलेली वेबसाईट या इंटरनेट प्रॉक्सीच्या मार्फंत तुमच्या संगणकावर उघडू शकता.
६)ही इंटरनेट प्रॉक्सी वेळोवेळी बदलत असते त्यामुळे अश्यावेळी,वर दिलेल्या दुव्यावर जावून नविन इंटरनेट प्रॉक्सीची यादी मिळवा आणि वरील सेटिंग्स अद्यवत करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment