मित्रानो या आधी सुद्धा आपण तुमच्या अनुदिनीवर चर्चापीठ कसे समाविष्ट कराल? याची माहिती भाग१ आणि२ मध्ये घेतली. आजच्या भागात आपण असे चर्चापीठ बनवण्या बाबत माहिती करून घेणार आहोत जे तुमच्या अनुदिनीच्या अथवा वेबसाईटच्या पानाच्या आकारानुसार आपला आकार बनवते..थोडक्यात ते चर्चापीठ कोणत्याही साईट अथवा ब्लॉग वर डकवता येते...याला इंग्रजी मध्ये embeddable forum म्हणतात.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://www.nabble.com/
२)त्यावर असलेल्या विविध पर्यांया पैकी Start a Free Forum पर्यांयाची निवड करा.
३)असे केल्यावर जे पान उघडेल त्यावर विचारलेली सर्व माहिती द्या.
(चित्र पहा.)
४)असे केल्यावर तुम्हाला पुढच्या पानावर एक संदेश दिसेल त्यामधील next message पर्यांयावर टिचकी दिल्यावर दुसरा संदेश दिसेल त्यात फोरम तुमच्या ब्लॉग/साईट वर डकवण्यासाठी आवश्यक कोड असेल तो कॉपी करून घ्या.
५)आता तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
६)आणि या आधी जे कोड तुम्ही कॉपी केले आहे ते नविन पेज अथवा नविन पोस्ट तयार करून त्या ठिकाणी पेस्ट करा हे सर्व कसे करायचे त्याची माहिती आपण या आधीच्या ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्रा मध्ये बर्याच वेळा घेतली आहे.
उदा. म्हणून खाली दिलेले चर्चापीठ बघा.
सोबत..प्रशांत दा. रेडकर धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment