जर तुम्ही वेबडिजायनिंग शिकत असाल तर HTML शिकल्यानंतर तुम्हाला CSS शिकणे गरजेचे आहे.ज्याना HTML शिकायचे असेल त्यांनी मराठी मधून वेबडिजायनिंग शिका या विभागाचा वापर करावा,ती लेखमालिका संपल्यानंतर, मगच मराठीमधून शिका या लेखमालिकेचा वापर करावा.ज्याना HTML ची माहिती आहे त्यांच्या साठी ही लेखमालिका आहे.
CSS म्हणजे काय?
CSS म्हणजे Cascading Style Sheets.याचा वापर वेबडिजायनिंग मध्ये केल्याने तुमच्या वेबसाईट मध्ये अनेक बदल करणे तुम्हाला सहज शक्य होईल.हे तुमचा वेळ तर वाचवेलच त्याशिवाय याच्या वापराने तुमच्या वेबसाईटचा झालेला कायापालट सुद्धा थक्क करणारा असेल.
आवश्यक सॉफ्टवेअर:
तुम्हाला यासाठी साध्या text editor ची गरज लागेल...नोटपॅडचा वापर यासाठी तुम्ही करू शकता.
Start > Programs > Accessories > Notepad मध्ये जावून तुम्ही त्याचा वापर करू शकता.
बाकी चाचणी करण्यासाठी तुम्हाला कोणताही वेब-ब्राउजर चालू शकतो.उदा. mozilla firefox इत्यादी.
CSS वापरण्याचे फायदे:
*CSS चा वापर केल्याने तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या वेबपानाचे जे स्वरुप आहे ते तुमच्या सोयीने बदलू शकता.त्यासाठी तुम्हाला फक्त एक CSS स्टाईलशीट बनवावी लागेल.
*हे प्रत्यक्ष कसे घडते ते प्रात्यक्षिकासह आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment