५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

जीमेल खात्यामधुन याहू मेल कसे पाठवाल?

मंडळी आज आपण जीमेलच्या इपत्यावरून याहूचा इपत्ता वापरून मेल कसे पाठवायचे याची माहिती करून घेणार आहोत.असे केल्याने तुम्ही तुमच्या जीमेल खात्यामधुनच याहूचा इपत्ता वापरून मेल करू शकाल.उदा. तुमचा जीमेलचा इपत्ता [email protected] असा असेल तर त्याच खात्यामधून तुम्ही [email protected] हा इपत्ता वापरून मेल पाठवू शकता.

हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या जीमेल खात्यावर लॉग-इन व्हा.



२)त्यानंतर त्या पानावर कोपर्‍यामध्ये mail settings नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.


३)मग  settings मध्ये Accounts and Import पर्यांयावर टिचकी द्या.



४)आता Send mail as: समोरील Send mail from another address पर्यांयावर टिचकी द्या.

५)आता जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे "Add another email address you own" मध्ये इपत्त्या समोर तुमचा याहूचा इपत्ता लिहून Next Step वर टिचकी द्या.


६)मग Send mail through yopur SMTP server?या पर्यांयामधील Send through Gmail ची निवड करा आणि Next Step वर टिचकी द्या.


७)आता हा तुमचाच इपत्ता आहे का?याची खात्री करून घेण्यासाठी एक Verification मेल जीमेल कडून तुमच्या याहू खात्यावर पाठवला जाईल.




८)यासाठी तुमच्या याहू खात्यावर लॉग-इन व्हा आणि आलेल्या इमेल मधील पडताळणी दुव्यावर(Verification link) टिचकी द्या अथवा त्या मेल मधील confirmation code चित्रामध्ये दाकविल्याप्रमाणे दिसणार्‍या पर्यांयामध्ये लिहून Verify वर टिचकी द्या.



९)असे केल्याने तुमच्या खात्याची पडताळणी जीमेल कडून पुर्ण होईल.

१०)मेल पाठवण्यासाठी compose mail पर्यांयाचा वापर करून From: समोरील ड्रॉप-डाऊन पर्यांयामधून ज्या इपत्त्यावरून मेल पाठवायचा असेल त्या पत्याची निवड करून तुम्ही याहू अथवा जीमेल इपत्यावरून इमेल पाठवू शकाल.
   जीमेल टिप्स आणि ट्रिक्स विभागात तुम्हाला जीमेल विषयीच्या उपयोगी टिप्स आणि ट्रिक्स मिळतील.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment