५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

एखादी वेबसाईट उपलब्ध आहे किंवा नाही हे कसे शोधाल?

 मंडळी बर्‍याच वेळा तुम्ही इंटरनेटचा वापर करत असताना काही वेबसाईट काही केल्या तुमच्या संगणकावरून उघडत नाहीत...या साईट एक तर उपलब्ध नसतात(Down असतात) अथवा तुमच्या इंटरनेट सेवा पुरवणा‌र्‍या कंपनीने किंवा ऑफिस मधल्या नेटवर्क व्यवस्थापकाने त्या Block केलेल्या असतात. उदा.फेसबुक जर तुमच्या संगणकावर उघडत नसेल तर ते तुमच्या ऑफिस मध्ये Block  केलेले आहे असे समजावे.

हे कसे शोधाल?



१)एखादी साईट उपलब्ध आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.

Down or Not


२)मग त्या साईटचा पत्ता द्या आणि downornot वर टिचकी द्या.
(चित्र पहा)


३)असे केल्याने एक चाचणी पार पाडली जाईल आणि तुम्हाला खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे संदेश मिळेल.

जर Up असे दर्शविले गेले तर ती साईट इंटरनेटच्या जगात उपलब्ध आहे आणि फक्त तुमच्या देशापुरता अथवा ऑफिस पुरता ती ब्लॉक करण्यात आलेली आहे असे समजावे

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment