५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

गुगल खात्यासाठी Two Step Verification कसे वापराल?

 ३ दिवसा आधी माझ्या मित्रपरिवारातील एका व्यक्तीने मला तिचे खाते हॅक तर झाले नाही ना? याबाबत भिती व्यक्त केली आणि तिने घाबरून तिचे खाते रद्द करायचे ठरवले.शेवटी मी तिला गुगल खात्याचे रक्षण करता यावे यासाठी गुगलची Two Step Verification कशी वापरायची ते दाखविले.तुम्हा सर्वांना सुद्धा ते उपयोगी पडावे म्हणून या लेखातून ते तुम्हा सर्वांना कळवत आहे. ते वापरून तुमचे गुगल खाते अधिक सुरक्षित करा. :-) 
हे कसे वापराल?



१)प्रथम तुमच्या गुगल खात्याच्या Account settings मध्ये जा.

२)तिथे गेल्यावर Account overview मध्ये Security विभागात Using 2-step verification समोरील Edit पर्यांयावर टिचकी द्या.


३)जे पान उघडेल त्यातील  Start setup  पर्यांयावर टिचकी द्या.

४)आता Set up your phone फोन मथळ्याखाली  choose one: मध्ये तुम्हाला दोन पर्यांय दिसतील
*Landline or mobile phone:Text message (sms) or vice call
*smartphone application:android/backberry/iphone


५)यातील Landline or mobile phone:Text message (sms) or vice call पर्यांयाची निवड करून तुमचा नंबर द्या,मग Send codes by:SMS text message पर्यांय़ निवडा.मग "Send code" पर्यांयावर टिचकी द्या.



६)आता गुगल कडून तुमच्या मोबाईल वर एक sms येईल,त्यात जो कोड असेल तो Code: समोरील चौकोनात लिहून झाल्यावर verify वर टिचकी द्या.

७)असे केल्यावर Your phone number is configured.Click Next to continue. असा संदेश दिसेल.

मग Next  पर्यांयावर टिचकी द्या.

८)आता जे नविन पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक संदेश असेल, But... what if your phone is unavailable, lost, or stolen? ज्यात तुमचा फोन हरवला अथवा चोरीला गेला तर काय कराल? अशी विचारणा केलेली असेल.म्हणून add backup पर्यांयावर जाण्यासाठी Next  वर टिचकी द्या.



९)आता असे जर झाले तर तुमच्या खात्याच्या सुरक्षेसाठी तुम्हाला काही backup codes मिळतील ते तुम्ही प्रिन्ट करू शकता अथवा सेव्ह करू शकता.(अथवा लिहून ठेवा.)



हे कोड Save करण्यासाठी Save to text file पर्यांयावर टिचकी द्या,यानंतर एक पॉप-अप विंडो उघडेल ज्यात तुम्हाला तुमच्या गुगल खात्याचा पासवर्ड पुन्हा द्यावा लागेल. असे केल्यानंतर तुमचे Backup verification codes  फाईल रुपात साठवण्यासाठीचा दुवा तुम्हाला मिळेल त्या वरून ती फाईल उतरवून घेवून ती तुमच्या संगणकावर सुरक्षित करा.

१०)Yes, I have a copy of my backup verification codes.  समोर टिचकी द्या आणि मग Next  वर जा.

११)आता तुम्हाला You can have codes sent to your backup phone number if your primary phone is unavailable, lost, or stolen.  असा प्रश्न विचारला जाईल.जर तुमचा आधीचा मोबाईल हरवला,चोरीला गेला अथव उपलब्ध नसला तर पडताळणी कोड दुस‍र्‍या नंबर वर पाठवण्याची सोय या द्वारे केली जाते. असा दुसरा backup नंबर द्या.

१२)(Optional) Test the phone  या पर्यांयाचा वापर करून हे काम करते की नाही याची तुम्ही चाचणी घेवू शकता.त्यासाठी चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे त्या पर्यांयावर टिचकी द्या आणि "Send code"  चा वापर करा.

१३)असे केल्याने एक कोड तुमच्या दुसर्‍या मोबाईल नंबर वर येईल.तो code : समोरील चौकोनात लिहा,मग verify वर टिचकी द्या.


१४)असे करून झाल्यावर पुढच्या पायरीवर जा.

१५)आता जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक संदेश असेल


त्या पानावरील Turn on 2-step verification पर्यांयावर टिचकी द्या.

१६) असे केल्यावर एक संदेश पुन्हा दाखविल्या जाईल त्यात तुम्हाला तुम्ही 2-step verification सुरू केले आहे. असे सांगितले जाईल.

१७)आता पुढच्या वेळी तुमच्या जीमेल खात्यावर लॉग-इन होताना, तुम्ही जेव्हा तुमचे युजरनेम आणि पासवर्ड इंटर करून,साईन-इन वर टिचकी द्याल,तेव्हा एक संदेश दिसेल आणि त्याच वेळी गुगल कडून एक verification कोड तुमच्या मोबाईल वर येईल.

१८)तो कोड Enter code: समोरील चौकोनात लिहा...मग verify वर टिचकी द्या.
जर तुम्हाला तोच कोड त्या संगणकासाठी ३० दिवस राहावा असे वाटत असेल तर Remember this computer for 30 days.  हा पर्यांय निवडा.

१९)असे केल्यावर Setup complete. 2-step verification has been turned on for this account.  असा संदेश दर्शविला जाईल.

फायदा:जरी हॅकरने तुमचा पासवर्ड मिळवला तरीही verification code  त्यांना मिळवता येणे शक्य नसल्याने तुमचे खाते अधिक सुरक्षित होते.
इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी विभागाला भेट द्यायला विसरू नका.
धन्यवाद, 
तुमचा मित्र, 
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment