५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर tools tips कसे समाविष्ट कराल?

 मंडळी आज आपण तुमच्या ब्लॉगवर tools tips चा समावेश कसा करायचा याची माहिती करून घेणार आहोत.
tools tips चा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग वरील प्रत्येक दुव्याबद्दल अधिक माहिती वाचकांना देवू शकता.
उदा. समजा एखाद्या वाचकाने तुमच्या ब्लॉगवरील एखाद्या दुव्यावर माऊस ठेवला की त्या दुव्या बद्दलची अधिक माहिती दाखविली जाते,त्यामुळे वाचकाना त्या दुव्याचा वापराबद्दल अधिक कल्पना येते.


हे कसे वापराल?


१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
त्यासाठी http://draft.blogger.com/ या दुव्याचा वापर करा.

२)या नंतर तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर जे घराच्या आकाराचे चिन्ह दिसते आहे त्यावर टिचकी द्या आणि Template पर्यांयाची निवड करा.

३)या नंतर जे पान उघडेल त्यावर तळाला असलेल्या Edit Template पर्यांयावर टिचकी द्या. मग Expand Widget Templates समोरील चौकोनात टिचकी द्यायला विसरू नका.

४)आता ctrl+f चा वापर करून
]]></b:skin> 
या कोडचा शोध घ्या.(चित्र पहा.)

५)आता खाली दिलेले Css कोड कॉपी(ctrl+c)करून ते या कोडचा वरती पेस्ट (ctrl+v)करा.


div#qTip { padding: 3px; display: none; background: #00c0ff; color: #ffffff; font: bold 9px Verdana, Arial, sans-serif; position: absolute;             z-index: 1000; -moz-box-shadow: 2px 2px 2px #afafaf;         /* You Can Change Shadow Background */ -webkit-box-shadow: 2px 2px 2px #afafaf; box-shadow: 2px 2px 2px #afafaf; }


६)या नंतर खाली दिलेल्या jQuery Files कॉपी(ctrl+c) करून
 ]]></b:skin>
च्या खाली पेस्ट(ctrl+v)करा.


<script src='http://ajax.googleapis.com/ajax/libs/jquery/1.3.2/jquery.min.js' type='text/javascript'></script>
<script language='JavaScript' src='https://sites.google.com/site/prashantredkar/qTip.js' type='text/JavaScript'></script>


चित्र पहा म्हणजे तुम्हाला काय करायचे त्याची कल्पना येईल.



















७)केलेले बदल सेव्ह करायला विसरू नका.हे कसे काम करते हे पाहायचे असेल तर माझ्या ब्लॉगच्या मुख्यपानावर जावून आधीच्या पोस्ट मध्ये जिथे जिथे पुढे वाचा हा पर्यांय आहे त्यावर माऊस घेवून जा..तुम्हाला हे कसे काम करते त्याची कल्पना येईल.

८)ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभागाला भेट द्यायला विसरू नका.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. छान सर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.सर मला माझ्या ब्लॉग वर पोस्ट साठी वेगवेगळे विभाग करायचे आहेत जसे तुम्ही तुमच्या ब्लॉग वर फेसबुक टिप्स,ब्लॉगिंग तंत्रमंत्र ई. आणि तुम्ही देलेला फोन्ट साईज आणि कलर चा कोड अजून ही माझ्या ब्लॉग वर काम करत नाही आहे. तुम्ही सांगितल्या प्रमाणेही मी प्रयत्न करून बघितले पण त्याने काही फरक पडला नाही. या साठी मी काय करू ते आपण सांगावेत.

    ReplyDelete
  2. जावा स्क्रिप्टचा जास्त वापर असेल तर एक स्क्रिप्ट दुसर्‍या स्क्रिप्टचे काम थांबवते त्यामुळे तसे होत असावे..मी येत्या काही दिवसात वेबसाईट सारखा दिसणारा मेनू बार कसा तयार करायचा त्या बद्दल लिहिणार आहे...त्याचा वापर करून वेगवेगळे विभाग तुमच्या ब्लॉग वर वेबसाईट सारखे दाखवणे शक्य होईल.

    ReplyDelete