मंडळी तुमच्या पैकी बरेच जण Feedburner चा वापर करत असतीलच.Feedburner च्या email Subscription या पर्यांयाद्वारे
तुमच्या ब्लॉगवरील लिखाणाच्या नोंदी तुमच्या वाचकांच्या इपत्त्यावर पाठवल्या जातात.या सर्व नोंदी तुमच्या गुगलच्या इपत्याचा वापर करून पाठवल्या जातात..कारण गुगलचे एकच खाते त्यांच्या सर्व सेवांसोबत वापरले जाते.उदा[email protected]
तुमचा खाजगी इपत्ता असा उघड करणे कधी कधी घातक असते..कारण तुमचे नाव सुद्धा त्या इपत्त्या सोबत दाखविले जाते..त्यामुळे तुमचा खाजगी इपत्ता सगळीकडे उघड होतो.
आज आपण हा इपत्ता कसा बदलायचा?जेणेकरून तुमची खाजगी माहिती सुरक्षित राहिल,त्याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या Feedburner खात्यावर लॉग-इन व्हा(ही गुगलची सेवा असल्यामुळे तुम्हाला त्यांच्या खात्याचा वापर करावा लागेल.) हे करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा.
http://feedburner.google.com/
२)FEED TITLE पर्यांयाखाली तुम्हाला तुमच्या ब्लॉगचे नाव दिसेल(जर तुम्ही feedburner सेवा वापरत असाल तरच)त्यावर टिचकी द्या.
३)जे पान उघडेल त्यातील Publicize पर्यांयावर टिचकी द्या.
४)यानंतर email Subscriptions पर्यांय़ावर टिचकी द्या.
५)ही सेवा वापरात नसेल तर खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे पर्यांय दिसेल त्यातील activate वर टिचकी द्या.असे केल्याने तुमच्या ब्लॉगच्या वाचकांसाठी Email Subscription हा पर्यांय उपलब्ध होईल.
६)आता Communication Preferences नावाचा पर्यांय चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे दिसेल.
Publicize -> email Subscriptions -> Communication Preferences
७)यातील Email “From” Address: मध्ये तुमचा इपत्ता बदलून तुम्हाला हवा तो इपत्ता द्या.
८)मग केलेले बदल जतन(save)करायला विसरू नका.
असे केल्याने यापुढे तुमच्या ब्लॉगच्या वाचकाना तुमच्या ब्लॉग वरच्या नोंदी त्यांच्या इपत्त्या वर पाठविल्या जाताना,तुमचा मुळ गुगल खात्याचा इपत्ता सुरक्षित राहिल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment