मित्रांनो फेसबुकने नुकतीच व्हिडीओ चॅट करण्याची सुविधा देवू केली आहे..ती तुमच्या फेसबुक खात्यावर कशी सुरु करायची ते आपण मागील लेखात पाहिले...
फेसबुक वर व्हिडिओ चॅट(facebook videocalling) कसे वापराल?
तशीच सोय जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर करता आली तर? हे शक्य आहे का? याचे उत्तर हो असे आहे :-)
फेसबुक वर व्हिडिओ चॅट(facebook videocalling) कसे वापराल?
तशीच सोय जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर करता आली तर? हे शक्य आहे का? याचे उत्तर हो असे आहे :-)
१)हे कसे काम करते हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या ब्लॉग मधील दृकश्राव्य गप्पा हा विभाग खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकता.
२)हे तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासाठी प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा.
३)जे पान उघडेल त्यावर Create a Room अथवा Sign in/Sign Up नावाचा पर्यांय दिसेल. त्यापैकी कोणत्याही एका पर्यांयावर टिचकी द्या.
४)असे केल्यावर खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक पान दिसेल त्यात योग्य ती माहिती भरा आणि Yes वर टिचकी द्या.
५)पुढच्या पानावरील Find your Friends पर्यांयाला तळाशी असलेल्या Skip वर टिचकी देवून रद्द करा.
६)असे केल्यावर जे पान उघडेल त्यात Profile Information भरा आणि update वर टिचकी द्या.
७)तुमच्या डाव्या हाताला स्क्रीनवर वेगवेगळे पर्यांय दिसतील (चित्र पहा)
८)त्यातील प्रत्येक पर्यांयावर टिचकी देवून योग्य ती माहिती भरा.
(चित्र पहा)
९)आता तुमचा चॅटरूम तयार झाला..तो तुमच्या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासाठी त्याच पानावर तळाला तुम्हाला Embed Code नावाचा दुवा दिसेल त्यावर टिचकी द्या.
10)असे केल्याने एक पॉप-अप विंडो उघडेल त्यातील कोड कॉपी करून ते तुमच्या ब्लॉगपोस्ट मध्ये पेस्ट करा अथवा पेज मध्ये समाविष्ट करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment