मंडली बर्याच वेळा आपल्याला ID Card ची गरज असते,तुमच्या समुहाला समजा एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचे असेल,उदा. सहल इत्यादी.तर तुमच्या समुहाचे एक वेगळे ओळखपत्र तयार करण्यासाठी तुम्ही ही पद्धत वापरू शकता.कारण छोट्याश्या समुहासाठी उदा. ५-१० जणांसाठी ID Card तयार करून घ्यायची असतील तर ते जास्त खर्चिक होते.मग केवळ १० मिनिटात तुम्हाला हवे तसे ओळखपत्र(ID Card) कसे तयार करायचे याची माहिती आज आपण इथे करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
आजच्या पद्धतीने आपण तुमचे दर्जेदार ओळखपत्र(ID Card) बनवणार आहोत जे प्रिंट करण्यासाठी मोफत आहे.
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
२)जे पान उघडेल त्यावरील खालील चित्रामध्ये दाखविलेल्या विभागा नुसार ह्व्या त्या विभागाची निवड करा.
३)असे केल्याने त्यांचा ऑनलाईन एडिटर उघडेल.
४)त्यात पॅनल वर दाखविलेले वेगवेगळे पर्यांय वापरून हवे ते बदल करा.
५)पुढील आणि मागील बाजुवर हवे ते बदल करून झाल्यावर save as पर्यांयाचा वापर करून ते कार्ड save करा.
ओळखपत्राची छपाई करण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते तयार करणे गरजेचे आहे..ते जर तुम्हाला टाळायचे असेल..तर ती स्क्रीन कॅपचर करून (म्हणजे त्या पानाचा तो भाग स्क्रीन कॅपचर करणार्या साधनांचा वापर करून,(स्क्रीन कॅपचर कशी करतात याची माहिती आपण पुढिल भागात करून घेणारच आहोत.)) तुमच्या संगणकावर चित्ररुपात save करा.
६)या नंतर त्याची रंगीत प्रिन्ट काढून ते आयडी कार्ड लॅमिनेट करून घ्या(लॅमिनेट करायला फक्त १०-१५ रुपये खर्च येतो.)
असे केल्याने तुमचे ओळखपत्र(ID Card) सहज कमी खर्चात घरच्याघरी तयार होईल.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
नमस्कार प्रशांत,
ReplyDeleteमला तुमच्या अनुदिनी वरील गुलाबाच्या फुलाच्या रहस्य सांगाल का ? ते कसा येत ? अन कसा काम करत ?
मला माझ्या अनुदिनी तसं करायला आवडेल.
धन्यवाद!
मी जावा स्क्रिप्ट मध्ये कोड लिहून ते केले आहे,येत्या काही दिवसात त्या कोड विषयी मी लिहिण. :-)
ReplyDelete