मित्रमैत्रिणींनो फेसबुकने आता व्हिडिओ चॅटची सुविधा सुरू केली आहे..या सेवेचा वापर करून तुम्ही आता तुमच्या मित्रपरिवाराशी दृकश्राव्य माध्यमातून संपर्क साधू शकता.
इंटरनेटमुळे जग जवळ येत चालले आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे.
हे कसे वापराल?
१)याचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जावे लागेल,त्यासाठी त्यावर टिचकी द्या.
२)असे केल्यावर जे पान उघडेल त्यावरील Video Calling
Talk to your friends face to face. Get started वर टिचकी द्या आणि setup रन करा.चित्र पहा.
(जे web browser यासाठी उपयुकत आहेत त्याची नावे आहेत.
*Mozilla Firefox
*Google Chrome
*Internet Explorer
*Safari)
३)पहिल्या वेळी हा setup रन करावाच लागेल
४)एकदा का install झाले की तुमच्या प्रोफाईलवर videocalling हा पर्यांय़ उपलब्ध होईल.
५)जेव्हा तुम्ही चॅट-बॉक्स उघडाल तेव्हा तुम्हाला video button दिसेल.त्यावर टिचकी द्या आणि तुमच्या मित्रपरिवाराशी दृकश्राव्य माध्यमातून गप्पा मारा.
६)तुमच्या मित्राच्या प्रोफाईल वर जावून videocalling चिन्हावर टिचकी देवून सुद्धा तुम्ही ते सहज करू शकता.
फायदे:तुमच्या परदेशातील नातलगांशी संपर्क साधने झाले सोप्पे.
धोके:सॉफ्ट्वेअरचा वापर करून कोणीही ते सहज रेकॉर्ड करू शकते,त्यामुळे मुलीनी अनोळखी व्यक्तीशी व्हिडिओ चॅट करताना काळजी घ्या.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment