*मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल,पण यश पचविणे फार अवघड असते.
*बुद्धीच्या वाढीसोबत अंतकरणाचा विकासही करा.
*नावे ठेवणे सोप्पे,पण नाव कमविणे कठीण गोष्ट आहे.
*दान घेण्यासाठी हात पसरू नका,दान देण्यासाठी हात वर करा.
*दुसर्याच्या दु:खात सहभागी व्हायला शिकणे,हेच खरे शिक्षण.
*ढीगभर आश्वासनापेक्षा टीचभर मदत चांगली.
*ज्याप्रमाणे भुकेशिवाय भोजन पचत नाही,त्याप्रमाणे दु:खाशिवाय सुख पचत नाही.
*ज्या ठिकाणी चिंता आहे,त्या ठिकाणी निद्रेचा वास नसतो.
*जगून मरण्यापेक्षा मरून जगण्यात मोठेपणा आहे.
*जो आपल्या माघारी टीका न करता तोंडावर टीका करतो,तोच खरा मित्र.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment