मित्रमैत्रिणींनो आज आपण आपले स्वत:चे मोफत ऑनलाईन वर्तमानपत्र कसे सुरु कराल? याची माहिती करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
२)जे पान उघडेल त्यावर सर्वात वर कोपर्याला Start a paper नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
३)असे केल्याने तुम्हाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Sign in using your account with twitter or facebook असे पर्यांय़ दिसतील.
४)त्यातील आपण facebook पर्यांयावर टिचकी देवू या.असे केल्याने Log in to use your Facebook account with Paper.li. असा संदेश दर्शवणारी खिडकी उघडेल त्यात तुमच्या फेसबुक खात्याचा पडताळणीचा तपशील म्हणजे तुमचा इपत्ता आणि परवलीचा शब्द भरा व लॉग-इन वर टिचकी द्या.
५)असे केल्यावर तुम्हाला त्या साईट वर प्रवेश मिळेल आणि जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे वेगवेगळे पर्यांय असतील.
६)Title पर्यांयासमोर तुम्ही तुमच्या वर्तमानपत्राचे तुम्हाला हवे असलेले नाव द्या.
७)Content streams: मध्ये तुम्हाला Add a stream पर्यांयाचा वापर करून तुमच्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या दाखवायच्या आहेत त्याचे RSS Feed अथवा Twitter #tag अथवा फेसबुक वरचे keywords, तुम्ही समाविष्ट करू शकता.
८)भाषेची निवड करून झाल्यावर Publish वर टिचकी दिल्यावर तुमचे स्वत:चे ऑनलाईन वर्तमानपत्र प्रकाशित होईल.आता ते तुम्ही तुमच्या मित्रपरिवारास पाठवू शकता अथवा ब्लॉगवर एखाद्या दुव्यावर ठेवू शकता.अथवा widget कोड वापरून ते तुमच्या ब्लॉगच्या साईड्बार मध्ये सुद्धा समाविष्ट करू शकता.
माझ्या ब्लॉगचे असे वर्तमानपत्र पाहण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
http://paper.li/f-1311594325
widget खाली दाखविल्याप्रमाणे दिसेल
मराठी ब्लॉगविश्वचे वर्तमानपत्र पाहण्यासाठी खाली दिलेला दुवा वापरा.
http://paper.li/f-1311595796
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment