मंडळी आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये आपण बर्याच बाबींची माहिती घेतली.आता पर्यंत तुम्ही ब्लॉग बनवण्यात सजवण्य़ात यशस्वी झाला असालच आता आपण अधिकाधिक प्रगत तंत्रांचा वापर करणार आहोत आणि तुमचा ब्लॉग अधिकाधिक अद्यवत बनवणार आहोत. सध्या बहुतेक जण फेसबुकचा वापर करत असाल..आणि त्यावर चॅट करत असाल...जर फेसबुक सारखेच चॅट तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर समाविष्ट करता आले तर, हे शक्य आहे का? याचे उत्तर हो असे आहे.माझ्या ब्लॉग वर तुम्ही तुमच्या उजव्या हाताला तळाच्या कोपर्यात त्या पर्यांयाची चाचणी घेवू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
chatbar
२)जे पान उघडेल त्यावर Try It For Free नावाचा पर्यांय दिसेल,त्यावर टिचकी द्या.
३)आता उघडलेल्या पानावर खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे तुमचा सविस्तर तपशील द्या.
४)पुढील पानावरील Not Using a plugin? पर्यांयाखालील जावास्क्रिप्टचे कोड कॉपी करा.
५)या नंतर तुमच्या ब्लॉगर खात्यामध्ये लॉग-इन करा.
६)ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.
मग Edit Template मध्ये जावून
७)मघाशी कॉपी केलेले कोड या टॅगच्या आधी पेस्ट करा.
८)या नंतर Template सेव्ह करायला विसरू नका.
९)ब्लॉगवर आता कोपर्यामध्ये तळाला फेसबुक पद्धतीचा चॅटबार दिसायला लागेल.
१०)या ठिकाणी तुम्ही तुमचे फेसबुक,twitter खाते वापरून सुद्धा गप्पा करू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

</body>टॅगचा शोध घ्या.

0 comments:
Post a Comment