धन्यवाद मित्र-मित्रमैत्रिणींनो,आज माझ्या ब्लॉगला Google Pagerank= ३ मिळाली.एक ब्लॉगर आणि माझ्या अनुदिनीचे वाचक रमण कारंजकर यांच्यामुळे मला ही बातमी कळली.त्यांचे मनापासुन आभार. :-)
गेली ६ महिने मला वेगवेगळया विषयामधले जे काही माहित आहे,जे माझ्या अनुभवांवर आधारलेले आहे,ते माझ्या मराठी मित्र-मैत्रिणीं पर्यंत, माझ्या शब्दात पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे.आज मिळालेले यश फक्त मराठी वाचकांच्या ताकदीने,त्यांच्या मराठी प्रेमातून मिळालेले आहे. :-)
५०००-५००० मित्रांचा फेसबुकवर समावेश न करता,कोणत्याही प्रकारची जाहीरात न करता,मित्रपरिवारातील "मराठी माणसांनीच" उडवलेली खिल्ली मनावर न घेता,घाणेरड्या पातळीवर लोकांनी केलेल्या टिका सहन करून,फक्त जगभर पसरलेल्या मराठी माणसांच्या "ताकदीवर" ६ महिन्यात हे यश मिळाल्याबद्दल मी सर्व मराठी माणसांचा मनापासुन आभारी आहे.
याच मराठी माणसांच्या ताकदीवर विश्वास ठेवून येत्याकाही महिन्यात मी मराठी सोशल नेटवर्किंग साईट सुरु करणार आहे.आर्थिक बाबींचा विचार केला तर तितक्याच खर्चात ती साईट जगभरातील लोकांसाठी खुली ठेवता येईल,पण फक्त मराठी प्रेमापोटी ती संपुर्ण मराठी मध्येच ठेवण्यात येणार आहे ती सुद्धा फक्त मराठी माणसांसाठीच,प्रसंगी आर्थिक झळ सोसून सुद्धा :-)
देव सर्वांना खुप सारे यश,पैसा,किर्ती मिळवून देवो.तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पुर्ण होवोत.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment