५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

मराठी मध्ये वेबडिजायनिंग शिका (भाग १)

 मंडळी आज पासून मी माझ्या अनुदिनीवर स्व:ताची वेबसाईट तुम्हाला बनवता यावी यासाठी एक मराठी शिकवणी सुरु करणार आहे.
मित्रानो तुम्ही इंटरनेटच्या जगात अनेक वेबसाईट पाहिल्या असतील आणि तुम्हाला ही वाटले असेल की आपण सुद्धा एक वेबपान बनवावे.आज पासून या ठिकाणी आपण वेबडिजायनिंगचे धडे शिकणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही काही दिवसातच त्यात प्राविण्य मिळवाल.



मंडळी यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टीची गरज आहे.
१) "नोटपॅड" Start->>Programs->>Accessories->>Notepad मध्ये जावून तुम्ही तो प्रोग्राम उघडू शकता.
२)वेब ब्राउजर उदा. इंटरनेट एक्सप्लोअर अथवा फायरफॉक्स.

वेबडिजायनिंग शिकण्यासाठी तुम्हाला HTML ही भाषा शिकणे गरजेचे असते..

HTML म्हणजे काय?
HTML म्हणजे Hyper Text Markup Language. केवळ काही दिवसातच तुम्ही त्यावर प्राविण्य मिळवू शकता.ही प्रोग्रामिंगची भाषा नाही..तर साधी सोप्पी markup भाषा आहे. ही भाषा काही markup tags ज्याना आपण HTML टॅग म्हणतो त्यांची बनलेली आहे.
प्रत्येक टॅग ही <> </> मध्ये असते आणि जोडीने येते.
उदा.
<b></b>

पहिला धडा.
१)प्रथम Start-->>Programs->>Accessories->>Notepad मध्ये जावून "नोटपॅड" मध्ये जावून "नोटपॅड" हा प्रोग्राम उघडा.

२)आता खाली दिलेले कोड कॉपी करून पेस्ट करा अथवा टाईप करा.
<html>
<body><h1>माझे पहिले शिर्षक(याठिकाणी हवे ते लिहा)</h1>

<p>माझा पहिला परिच्छेद.(याठिकाणी हवे ते लिहा)</p>

</body>
</html> 

*या ठिकाणी
<html> </html> 
मधले शब्द तुमची वेबसाईट बनवण्यासाठी मदत करतात.

*
<body></body>
मधले सर्व कोड तुमच्या वेबसाईट साठी आवश्यक असणारे कोड समाविष्ट करतात.

*
<h1></h1>
आणि मध्ये तुम्ही जे काही लिहिता ते तुमच्या लिखाणाचा मथळा(heading) ठरवतात.

*
<p></p>
मध्ये लिहिलेले लिखाण हे तुमच्या लिखाणाचा परिच्छेद ठरवते.

३)आता तुम्हाला हे कोड सेव्ह करावे लागतील, त्यासाठी, नोटपॅडच्या फाईल मेनू मध्ये जावून save as वर टिचकी द्या.

४) मग File Name समोर "My First Page(तुम्हाला जे नाव हवे ते).html" असे नाव लिहून Save as type समोर All हा पर्यांय निवडा. Encoding: ANSI राहू द्या...जर तुम्ही मराठी मध्ये मथळा,परिच्छेद लिहिला असेल तर Encoding:Unicode big indian पर्यांयाची निवड करा.नाही कळले तर खालील चित्र पहा.


५)मग सेव्ह वर टिचकी द्यायला विसरू नका.

६)आता त्या "My First Page.html"वर टिचकी दिल्यावर ती तुमच्या वेबब्राऊजर मध्ये उघडेल आणि खालील प्रमाणे काही ना काही दिसेल,

७)जे झाले तुमचे पहिले पान. :-) स्व:ता सराव करून बघितल्या वर तुम्हाला ते सहज जमेल.त्यामुळे करून बघा.

८)परत पुढच्या भागात भेटूया
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment