मित्रानो आज आपण तुमचा Wordpress Blog तुमच्या घरच्या संगणकावर कसा सुरु (होस्ट) कराल? याची माहिती करून घेणार आहोत.याचे फायदे म्हणजे तुमच्या Wordpress Blog मध्ये कोणतेही बदल ऑनलाईन करण्यापुर्वी तुम्ही ते ऑफलाईन तुमच्या संगणकावरच करून बघू शकता..कारण असे करताना तुमचा घरचा संगणकच सर्व्हरचे काम करील आणि कसे करून Wordpress चा वापर करून स्वत:ची साईट कशी इंटरनेट वर कशी होस्ट केली जाते याची तुम्हाला कल्पना येईल.
१)प्रथम तुमच्या संगणकाला सर्व्हर मध्ये बदलण्यासाठी तुम्हाला एका सॉफ्टवेअरची गरज लागेल.अशी बरीच सॉफ्ट्वेअर आहेत,जी मोफत डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. उदा.XAMPP,wamp,easyphp
२)आज आपण XAMPP वापरून ते कसे करायचे ते पाहणार आहोत.
३)प्रथम खाली दिलेल्या दुव्या वरून XAMPP डाऊनलोड करून घ्या.
४)installer डाउनलोड झाल्यावर installer.exe फाईल रन करा.
५)त्या नंतर खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे XAMPP तुमच्या संगणकाच्या c:\xampp फोल्डर मध्ये इन्स्टॉल होईल.
६)एकदा का XAMPP इन्स्टॉल झाला की त्या नंतर तुमच्या संगणकाच्या पडद्यावर XAMPP Control Panel नावाचे शॉर्टकट आयकॉन तुम्हाला दिसेल.
७)त्या आयकॉन वर टिचकी दिल्या वर जी नविन विंडो उघडेल ती खालील चित्राप्रमाणे असेल.
८)ते पाहिल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे Apache, Mysql या दोन Service सुरु आहेत. त्याच आपल्यासाठी उपयुक्त आहेत...जर त्या सुरु नसतील तर त्या Service समोरील Start पर्यांयावर टिचकी देवून तुम्ही ती Service सुरु करू शकता.
९)उपयोग करून झाल्यावर जर तुम्हाला XAMPP बंद करायचा असेल तर XAMPP Control Panel मधील Exit वर टिचकी देवून ते तुम्ही सहजपणे करू शकता.
१०)आता तुमचे XAMPP व्यवस्थित इन्स्टॉल झाले का हे चेक करण्यासाठी तुमच्या वेब ब्राऊजर मध्ये http://localhost टाईप करा. तसे केल्याने खालील चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे पान उघडेल आणि XAMPP इन्स्टॉल झाला आहे असे दर्शविणारा मॅसेज मिळेल.
पुढील भागात आपण हेच XAMPP वापरून तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? याची माहिती करून घेवू या.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment