मंडळी आज आपण तुमच्या ब्लॉग वरील Navbar कसा काढून टाकायचा? याची माहिती करून घेणार आहोत.तुम्ही जर ब्लॉगरची templates वापरत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आला असेल ती म्हणजे तुमच्या ब्लॉगच्या सर्वांत वरती तुम्हाला एक Navbar दिसतो.जर पुढे मागे तुम्हाला तुमचा ब्लॉग वेबसाईट मध्ये बदलायचा असेल तर ते चांगले दिसत नाही आणि तसाही त्याचा काही उपयोग नसतो. मग हा Navbar कसा लपवायचा याची आज आपण माहिती करून घेवू या.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या ब्लॉगर खात्यावर लॉग-इन व्हा.
२)मग ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जा
३) Edit Template मधील Expand Widget Templates या पर्यांया समोर टिचकी द्या.
४)या नंतर
]]></b:skin>
चा शोध घ्या आणि खाली दिलेला कोड कॉपी(ctrl+c) करून पेस्ट(ctrl+v) करा.
#navbar-iframe { height:0px; visibility:hidden; display:none }
५)या नंतर सेव्ह करायला विसरू नका.
असे केल्याने तुमच्या ब्लॉग वरून Navbar निघून जाईल. असे अनेक तंत्र-मंत्र जाणून घेण्यासाठी फेसबूक वरचे पान लाईक करायला विसरू नका.
तुमचा मित्र
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment