जीव कसा गुदमरतोय,
आज रखरखलेल्या उन्हात.
मन पुन्हा हरवून गेलय,
आठवणींच्या बनात.
घामाच्या धारा ओघळतायेत,
मला ओलाचिंब पाऊस आठवतोय.
तुझ्यासोबत घालवलेले क्षण,
मी असेच मनात साठवतोय.
झाडावर शांत आहेत आज...,
एरवी किलबिलणारे पक्षी.
पानाफुलात शोधतोय मी...,
तुझ्या तळहातावरची नाजुक नक्षी.
तुझी आठवण आली की...,
मन माझे होते दिवाणे.
आणि मग शोधू लागते,
तुझ्या भेटीचे बहाणे.
माहित असतं तुझं
येण शक्य नसतं.
मला जे सांगायचं,
ते शब्दातून व्यक्त नसत.
तुझी तरीही वेडयासारखा,
वाट पाहतो मी उगाच.
तू मात्र व्यस्त आहेस,
तुझ्या तुझ्याच जगात.
कवी प्रशांत दा. रेडकर.
आज रखरखलेल्या उन्हात.
मन पुन्हा हरवून गेलय,
आठवणींच्या बनात.
घामाच्या धारा ओघळतायेत,
मला ओलाचिंब पाऊस आठवतोय.
तुझ्यासोबत घालवलेले क्षण,
मी असेच मनात साठवतोय.
झाडावर शांत आहेत आज...,
एरवी किलबिलणारे पक्षी.
पानाफुलात शोधतोय मी...,
तुझ्या तळहातावरची नाजुक नक्षी.
तुझी आठवण आली की...,
मन माझे होते दिवाणे.
आणि मग शोधू लागते,
तुझ्या भेटीचे बहाणे.
माहित असतं तुझं
येण शक्य नसतं.
मला जे सांगायचं,
ते शब्दातून व्यक्त नसत.
तुझी तरीही वेडयासारखा,
वाट पाहतो मी उगाच.
तू मात्र व्यस्त आहेस,
तुझ्या तुझ्याच जगात.
कवी प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment