मित्रानो कीबोर्ड शॉर्टकट्सचा वापर केला तर तुम्ही संगणकावर काम करताना अनेक गोष्टी वेगाने करू शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता.
उदा. जर तुम्हाला एखादि गोष्ट कॉपी करायची असेल तर Select All करून तुम्हाला माउसचा वापर करून कॉपी करून ते पेस्ट करावे लागते,याउलट ctrl+A चा वापर करून आपण सहज सर्व Select करून ctrl+c करून ते कॉपी करतो व ctrl+v करून ते तितक्याच सहजतेने पेस्ट होते.
आज आपण उपयोगी पडतील अश्या कीबोर्ड शॉर्टकट्सची माहिती करून घेवू या.
Ctrl + C or Ctrl + Insert
याचा वापर आपण Select केलेले उतारे अथवा शब्द कॉपी करण्यासाठी करतो.
Ctrl + V or Shift + Insert
याचा वापर कॉपी केलेले उतारे अथवा शब्द पेस्ट करण्य़ासाठी होतो.
Ctrl + Z and Ctrl + Y
एखाद्या वेळी केलेले बदल नको असतील तर आपण याचा वापर करू शकतो
उदा. तुम्ही एखादा उतारा cut केलात तर तो परत आणण्यासाठी तुम्हाला Ctrl + Z चा वापर करावा लागेल.
Ctrl + Y चा वापर करून तुम्ही तो उतारा परत cut करू शकता.
Ctrl + F
Find हा पर्यांय कोणत्याही प्रोग्राम मध्ये वापरता यावा यासाठी याचा वापर करतात.
उदा.Internet browse उघडलेला असताना हा वापरून तुम्ही त्यावर असलेल्या पानावरचा नेमका हवा असलेला शब्द,वाक्य शोधू शकता.
Alt + Tab or Alt + Esc
Alt + Tab चा वापर करून तुम्ही तुमच्या संगणकावर उघडलेल्या वेगवेगळ्या Tab गरजे नुसार निवडू शकता.
Ctrl + Tab
याचा वापर जलद गतीने एका टॅब मधून दुसर्या टॅबमध्ये जाण्यासाठी होतो.
Ctrl + Left arrow / Right arrow
एखादा शब्द पुढे अथवा मागे जायचे असेल तर याचा वापर होतो.
Ctrl + Home / End
एखाद्या उतार्याच्या सुरवातीला अथवा तळाला जायचे असेल तर याचा वापर होतो.
Ctrl + P
तुम्ही पाहत असलेले वेबपान अथवा Word document प्रिन्ट करण्यासाठी तुम्ही हा पर्यांय वापरू शकता.
Page Up / Space bar and Page Down
page up अथवा down की चा वापर केल्याने तुम्ही document मध्ये एक पान सहज वर अथवा खाली जावू शकता
browsing करताना Space bar चा वापरून तुम्ही एक पान खाली जावू शकता.Shift आणि Space bar चा वापर केला तर तुम्ही एक पान वर जावू शकता.
काही शंका असतील तर, वापरून बघा,त्यांचे आपोआप निरसन होईल. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment