५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा मोबाईल काही वेळासाठी अनुपलब्ध(Unreachable) कसा ठेवाल? ;-)

मंडळी कधी कधी मोबाईल वर तुम्हाला समोरच्याचा कॉल घ्यायचा नसतो, अश्या वेळी जर तुम्ही समोरच्याचा कॉल घेतला नाही अथवा मोबाईल बंद ठेवलात,तर समोरच्याला कळते की ही व्यक्ती आपला कॉल घेण्यास टाळाटाळ करते आहे.अश्याने त्या व्यकती सोबत असलेले संबंध बिघडू शकतात.
पण हेच जर काही काळासाठी तुमचा मोबाईल अनुपलब्ध(Unreachable) करून करता आले तर? अश्याने त्या समोरच्या व्यक्तीला ते कारण खरे वाटेल कारण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला संपर्क करेल तेव्हा तेव्हा तिला "The number you are trying to reach is not reachable. Please try again later" असा संदेश ऐंकू येईल.

ही युक्ती कशी वापराल?



१)यासाठी प्रथम तुमच्या मोबाईल फोनच्या settings मध्ये जा.
तिथे तुमच्या फोनच्या मॉडेल प्रमाणे phone settings अथवा network settings नावाचा पर्यांय दिसेल..त्यातील Operator Selection अथवा network Selection पर्यांयावर टिचकी देवून Manual ची निवड करा.

२)असे केल्यावर २०-३० सेकंदाच्या सर्च नंतर तुम्हाला सर्व मोबाईल operatorsची यादी दिसेल..त्यातील तुमच्या नेटवर्क operator ऎंवजी दुसर्‍या कंपनीच्या network ची निवड करा.
उदा.
तुम्ही जर Vodafone वापरत असाल तर त्या ऎंवजी Idea or Airtel or Docomo यातील काहीही निवडा..

३)हा बदल केल्यावर तुमच्या मोबाईलचे सिग्नल दाखविणारा बार रिकामा दिसेल.

४) आता जो कोणी त्या वेळेत तुम्हाला कॉल करेल त्याना "The number you are trying to reach is not reachable. Please try again later". असा संदेश मिळेल.

५)ठरल्या प्रमाणे काम झाले की पुन्हा settings मध्ये जावून तुमच्या मोबाईल कंपनीच्या network ची निवड करा.
अश्याने तुमचा नंबर पुन्हा एकदा सर्वांसाठी उपलब्ध होईल.

प्रशांत रेडकर सोबत फेसबूक वरचे पान


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

11 comments:

  1. हे तुम्ही करुन पहिलेले दिसत नाही. तुमचा करार ज्या कंपनीबरोबर असेल त्याव्यतिरिक्त इतर सेवा निवडता येत नाही.

    हल्ली मोबाइलमध्ये "offline" किंवा "flight" मोड असते. नोकियामध्ये "offline" प्रोफ़ईल निवडता येते. असे केल्याने मोबाइल antenna बंद करतो व तुम्ही मोबाईल बंद न करता नेटवर्क पासून विलग करू शकता.

    ReplyDelete
  2. Prashant, Thank you for sharing this wonderful information ! This is so helpful ! Can u also please guide me, how to chat through mobile?

    ReplyDelete
  3. किरण मी कोणतीही पोस्ट करण्याआधी स्वत: करून बघतो..त्या नंतर लिहितो...हे १०० % काम करते..Network Selection करताना Automatic मोड न ठेवता....manual मोड निवडावा लागतो..त्यासाठी vip नंबर असण्याची काही गरज नाही. :-)

    ReplyDelete
  4. Feelings:मोबाईल मधून चॅट करणे सहज शक्य आहे,त्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये MSN,GTALK,ebuddy या पैकी एक तरी सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे,सध्याच्या नविन मोबाइल मध्ये यापैकी एखादे तरी असते. :-)

    ReplyDelete
  5. किरण Flight मोडमध्ये मोबाईल स्विच ऑफ आहे असा मॅसेज मिळतोमध्येच,सर्वच मोबाईल मध्ये हा मोड नसतो, ट्रिकचा मुळ उद्देश समोरच्याला मोबाईल नंबर not reachable असा संदेश ऐंकू यावा असा आहे.:-)

    ReplyDelete
  6. हे नोकियामध्ये चालत नाही हे मी खात्रिलायक सांगू शकतो. तुम्ही म्हणता तसे फ़क्त तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही रोमींगवर असाल. होम नेटवर्क मध्ये असताना इतर सर्विस प्रोवायडर तुम्हाला नेटवर्क वर कनेक्ट करु देत नाहीत.

    एक उपाय करू शकता, "बंद" ओवन मध्ये मोबाईल १ मिनीट ठेवा. ओवनच्या बाजूला मायक्रोवेव कवच असते त्यामूळॆ मोबाइलला नेटवर्क मिळत नाही, मग पटकन बाहेर काढून flight मोड लावा किंवा बंद करा. त्यामूळे तुम्ही not reachable होऊ शकाल.

    ReplyDelete
  7. नोकिया विषयी मला माहित नाही..पण बाकी मोबाईल मध्ये हे सहज होते..फक्त Network Selection>manual करावे लागते.
    माझ्या मित्राच्या नोकिया s४० मध्ये ही युक्ती काम करते,या व्यतिरिक्त dual sim ,triple sim मोबाईल मध्ये सुद्धा या युक्तीचा वापर करून एक sim not reachable करून दुसरे आरामात वापरता येते..आणि घरा व्यतिरिक्त ओवन आपल्याला बाहेर असताना उपलब्ध नसतो. :-)

    ReplyDelete
  8. does not work in in my nokia

    ReplyDelete
  9. मी त्याबद्दल आधीच्या टिप्पणी मध्ये लिहिले आहे

    ReplyDelete
  10. prashant sir majhyakade LG ani Samsung aahe.. donhi mobilevar not allowed asa massage yeto

    ReplyDelete
  11. ही युक्ती नोकिया s४०,micromax,इतर dual sim ,triple sim मोबाईलमध्ये काम करते..थोड्याफार फरकाने सेटिंग्स सारख्याच आहेत, तुमच्या मोबाईलचे User Manual पाहिलेत तर नेमके कुठे बदल करायचे ते तुमच्या लक्षात येईल.

    ReplyDelete