५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉग वर Favicon कसे समाविष्ट कराल?

मंडळी आता पर्यंत आपण ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या विषयी बरीच माहिती करून घेतली...ज्यांना या आधीचे लेख वाचायचे असतील त्यांनी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या विभागाला भेट द्यावी.

मित्र-मैत्रिणींनो प्रथम आपण याची माहिती करून घेवू की 
Favicon म्हणजे नेमके काय?



Favicon हे एक छोटे चिन्ह असते जे तुमच्या ब्लॉगचा पत्ता तुमच्या वेबब्राउजर मध्ये असताना त्याच्या समोर दिसते.तुमचा वेबपत्ता जेव्हा कोणी यूजर बूकमार्क करतो तेव्हा ह्या चिन्हामुळे तुमचा ब्लॉग ओळखणे सहज शक्य होते...अधिक खोलात न जाता...फक्त माझ्या ब्लॉगच्या पत्त्यावर ब्राउजरच्या Address bar मध्ये नजर टाकल्यावर जे फिरणारे चिन्ह दिसते, ते म्हणजे Favicon-"favorites icon"

ते तुमच्या ब्लॉग वर कसे समाविष्ट कराल?

१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.

favicon-generator


२)त्या नंतर त्या पानावर तळाला Source Image नावाचा जो पर्यांय दिसेल त्या समोरील Browse वर टिचकी देवून तुम्ही तुमच्या ब्लॉगला हवे असलेले Favicon साठीचे चित्र तुमच्या संगणकावरून निवडा.

३)Scrolling Text (optional) हा पर्यांय निवडणे गरजेचे आहे असे नाही..तुम्हाला जर फिरणारी अक्षरे समाविष्ट करायची असतील तर तुम्ही हा पर्यांय वापरू शकता.

४)या नंतर Generate FavIcon या पर्यांयावर टिचकी द्या.

५)हा favicon Download करण्यासाठी animated favicon.gif वर राईट क्लिक करून "Save Target as..." or "Save Image as..." या पैकी योग्य त्या पर्यांयाचा वापर करून ते तुमच्या संगणकावर Save करा.

६) या नंतर http://tinypic.com/ या फ्री इमेज होस्टिंग साईट वर ते animated favicon.gif तुमच्या संगणकावरून अपलोड करा.

७)कोड वेरिफिकेशन झाल्यावर ती इमेज अपलोड होईल

त्यानंतर पुढिल प्रमाणे वेगवेगळे दुवे दाखवणारे पान उघडेल,

८)त्यातील Direct Link for Layouts मध्ये दाखविलेली लिंक कॉपी करून घ्या.

९)आता ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो Template पर्यांय दिसतो.त्याच्यावर टिचकी द्या.मग Edit Template मध्ये जावून
टॅबच्या खाली, दिलेले कोड मगाशी कॉपी (ctrl+c)केलेली लिंक
टाकून पेस्ट (ctrl+v)करा.




१०)शेवटी तुमचे Template सेव्ह करायला विसरू नका.

आता ब्राउजर मध्ये जावून तुमच्या ब्लॉगचा पत्ता Favicon सोबत कसा दिसतो ते पहा.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

11 comments:

  1. खूप छान माहिती.. पण हे Favicon आपल्या ब्लॉगच्या लिंक मधे दिसायला बराच वेळ लागतो. कधी कधी तर २-३ आठवडेही.

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरब,:-) जर तू मी लिहिलेल्या सर्व पायर्‍या योग्य रितीने पार पाडल्यास तर अवघ्या २ मिनिटा मध्ये Favicon ब्लॉगच्या url समोर दिसू लागेल...हे खुपच सोप्पे आहे...जर तसे दिसत नसेल तर ब्राउजरची history काढून टाकायला विसरू नको. आणि ज्या वर आपण ती फाईल होस्ट करणार आहोत तो सर्व्हर नेहमी उपलब्ध असला म्हणजे काम झाले.

    ReplyDelete
  3. हो. हे मी आधीच केलं आहे. पण तरीही माझ्या ब्लॉगचा Favicon लिंक मधे दिसत नाही.

    ReplyDelete
  4. हेरब तुझ्या साईटचे source code मी चेक केले. त्यात <![CDATA[ टॅगच्या वर ते कोड पेस्ट करून बघ काय होते,कदाचीत त्याने फरक पडेल..अथवा मग तुला .ico फॉर्मट मध्ये इमेज अपलोड करावी लागेल.

    ReplyDelete
  5. ओह ओके.. आत्ता करून बघतो.

    ReplyDelete
  6. तरीही चालत नाहीये. आणि .ico format मधे tinypic वर अपलोड होत नाही. :(

    ReplyDelete
  7. सही !!!!!!!!! आता चालतंय.. आता मी .png फाईल अपलोड केली.. आता व्यवस्थित चालतं. प्रशांत, अनेक आभार मित्रा.

    ReplyDelete
  8. हो आताच पाहिले ते मी तुझ्या साईटवर :-)..साईटचे टेंप्लेट जर बदली केलेस तर एनिमेशन असलेल्या .gif फाईल समाविष्ट करती येतील.http://www.iconj.com/favicon_hosting.php साईटवर .ico format मध्ये फाईल अपलोड करता येतील.

    ReplyDelete
  9. Mee pan FAVICON takle mazya blog var pan khup divsanee te disle. Mee tar tyachi aasha sodun dilelee pan achanak blog var picture browse karaychi vicarna zali , tevha try kele aani mag FEVICON active zale.
    Aso,
    khup dhanyavaad yaa mahiti baddal, mee tumchya blog chya most of the tips follow upayogaat aante.

    ReplyDelete
  10. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद,आता Favicon समाविष्ट करणे अधिकच सोप्पे झाले आहे.
    तुमच्या ब्लॉग वर Favicon कसे समाविष्ट कराल?(भाग२) मध्ये मी त्याबद्दल लिहिले आहे..हा त्याचा दुवा :-)
    http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/06/favicon.html

    ReplyDelete