५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवरील पोस्टला पासवर्ड प्रोटेक्शन कसे द्याल?

मंडळी आज आपण तुमच्या ब्लॉग वर अथवा एखाद्या पोस्ट वर पासवर्ड वापरून,त्याला संरक्षण कसे द्यावे? याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

१)जर तुम्हाला एखाद्या ब्लॉग पोस्टसाठी जर हे पासवर्ड प्रोटेक्शन वापरायचे असेल तर, प्रथम तुमच्या लॉग-इन व्हा आणि तुमच्या ब्लॉगच्या Dashboard वर जावून Posting>New Post>Edit Html पर्यांयाची निवड करा.

 

अथवा

जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या एखाद्या पेजला पासवर्ड प्रोटेक्शन द्यायचे असेल Edit Pages>New Page>Edit Html पर्यांयाची निवड करा.


३)आता खाली दिलेला कोड कॉपी ctrl+c करून तुमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये पेस्ट ctrl+v करा.

<script language="JavaScript">
var password;
var pass1="your-password";
password=prompt('Enter your password in order to view this page!',' ');
if (password==pass1) alert('Correct password, OK to enter!');
else {
  window.location="site-link ";
}
</script>

४)या कोड मध्ये your-password च्या जागी तुमचा पासवर्ड टाका आणि site-link च्या जागी ती लिंक टाका ज्यावर पासवर्ड चुकीचा टाकल्यावर यूजरला पाठवले जाईल..

उदा.साठी खालील चित्र पहा.


"डेमो"साठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.


तळटीप:
प्रत्येक गोष्टीला तोड असते पण प्रत्येक व्यक्तीला हे प्रोटेक्शन कसे काढायचे ते माहित नसते..त्यामुळे एखाद्या पोस्टसाठी अथवा तुमच्या संपुर्ण ब्लॉगसाठी तुम्ही हे पासवर्ड प्रोटेक्शन वापरू शकता.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. but it is not secure any can hack ur pass password.

    click on (View) on menu bar -> select (page source) or (view source) option

    then any one can see your javascript.

    ReplyDelete
  2. हो,हे खुप बेसिक प्रोटेक्शन आहे,जावा स्क्रिप्ट डिसेबल करून सुद्धा तोडता येते..पण सामान्य वाचकाना याची माहिती असतेच असे नाही..एखाद्या पोस्ट वर ते सहज वापरता येते...लोक बहुतेक वेळा पहिला प्रयत्नात दुसर्‍या वेबसाईट वर रिडायरेक्ट झाल्यामुळे परत ती पोस्ट वाचायचा प्रयत्न करत नाहीत. :-)

    ReplyDelete