हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
free copyright
२)आता चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक पान उघडेल.त्यातील वरच्या बाजुला उजव्या कोपर्यात असलेल्या REGISTER या पर्यांयावर टिचकी द्या
अथवा त्याच पानावर protecting your creations वर टिचकी द्या.
३)आता जे पान उघडेल त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे तुमचे नाव,इ-पत्ता इत्यादी आवश्यक माहिती भरा त्यानंतर PROTECT वर टिचकी द्या.
४)आता तुमच्या ई-पत्ता वर एक मेल पाठवला जाईल त्यातील दुव्यावर टिचकी देवून तुमच्या खात्याच्या खरेपणाची शहानीशा पुर्ण करा.
५)आता दुव्यावर टिचकी दिल्यामुळे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे पान उघडेल,त्यातील PROTECT MY CREATION वर टिचकी द्या.
६)आता तुम्हाला कोणत्या प्रकारचे पाहिजे या बाबत विचारणा केली जाईल.
1)File
2)blog or Podcast
3)web page
७)आपल्याला ब्लॉग वरच्या लिखाणासाठी प्रताधिकार हवे असल्यामुळे केवळ दुसर्या blog /Podcast या पर्यांयावर टिचकी द्या.
८)या नंतर उघडणार्या पानावर Site Feed URL च्या समोर तुमच्या ब्लॉगच्या Feed URL चा पत्ता भरून PROTECT वर टिचकी द्या.
९)असे केल्यावर खालील चित्रा प्रमाणे दिसेल,मग नविन पान उघडेल..
त्यातील कोड कॉपी करून ते तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये Add Html/Java Script पर्यांयाचा वापर करून पेस्ट करा.
१०)असे केल्याने तुमच्या ब्लॉग वर तुमचे कॉपीराइट्स दर्शवणारे चिन्ह दिसू लागेल आणि दर वेळी तुम्ही जेव्हा नविन लेख लिहाल तेव्हा तुमच्या लिखाणाचे प्रताधिकार दर्शविणारा एक मेल तुम्हाला तुमच्या ई-पत्त्यावर पाठवला जाईल.तो तुम्ही पुढील उपयोगासाठी सांभाळून ठेवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
Thanks prashant ......tujhya blog varil information mule me majha blog barach update karu shakali . :-)
ReplyDeleteधन्यवाद, सर्वांना ब्लॉगिंग करताना मदत मिळावी आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सची संख्या वाढावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे..अजुन बरेच काही लिहायचे आहे, अधिकाधिक तंत्र-मंत्र जाणून घ्यायचे असतील तर फेसबूक वरचे पान आहे.ते लाईक केले तर, त्यावर अपडेट्स मिळत राहतील.
ReplyDelete