मंडळी मागच्या भागात आपण right click disable करून कॉपी करणार्याना कॉपी करू नका याची जाणिव कशी करून द्यायची याची माहिती घेतली..तरीही काही चोर ब्लॉगर कशी कॉपी करतात ते देखिल आपण पाहिले.
आजच्या लेखात आपण तुमच्या ब्लॉगवरून होणारी चोरी कशी शोधायची याची माहिती घेवू.
पद्धत १)
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
२)जे पान उघडेल त्यावर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे तुमच्या अनुदिनीचा पत्ता टाकून Go वर टिचकी द्या.
३)असे केल्याने तुमच्या ब्लॉग वरची माहिती चोरून कोणी ती आपल्या ब्लॉग वर अथवा वेबसाईट वर ठेवली आहे का ते तुम्हाला कळेल.
४)तुमचा ब्लॉग हा कॉपी पासून संरक्षित(protected) आहे हे समोरच्याला कळावे यासाठी खालील दुव्यावरून योग्य त्या banner ची निवड करून तुम्ही तो तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये डकवू शकता.
॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒॒@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
पद्धत २)
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
२)जे पान उघडेल त्या वरील चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे Option 1 - Add an image badge to your blog नावाचा पर्यांय दिसेल,त्यात दाखविलेले कोड कॉपी करून Add html/java script पर्यांयाचा वापर करून तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये ते डकवू शकता.
३)असे केल्याने जेव्हा कोणी तुमच्या ब्लॉग वरून काही कॉपी करेल तेव्हा त्या banner चा रंग बदलून लाल होईल.यावरून तुम्हाला कळेल की तुमच्या ब्लॉग वरून कॉपी होत आहे.
पुढील लेखात आपण तुमच्या लिखाणाचे कॉपीराईट्स कसे मिळवायचे तसेच तुमच्या ब्लॉग वरून होणारी कॉपी कोणत्या लिखाणाची,किती शब्दांची होते ते अचुक असे शोधायचे याची माहिती घेवू.
प्रशांत रेडकर सोबत फेसबूक वरचे पान
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment