५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

फेसबूक वर Voice Messages कसे पाठवाल?

सतत फेसबूक वर टाईप करून status  बदलणे कंटाळवाणे असते..त्यापेक्षा तुमच्या आवाजा मध्ये Voice Messages पाठवून  ते मित्राना ऐंकवणे शक्य झाले तर? हो हे सहज शक्य आहे.

एक फेसबूक application वापरून तुम्ही ते सहज करू शकता..हे इतके अदभुत आहे..की त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवाजा मध्ये तुमचे status update करू शकता,तुमच्या मित्राना voice messages त्यांच्या walls  वर पाठवू शकता.

हे कसे कराल?



१)प्रथम खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.हे करताना तुम्ही तुमच्या फेसबूक अकांउन्ट वर लॉग-इन असने आवश्यक आहे.

mymic


२)आता जे पान उघडेल ते इतर प्रत्येक फेसबूक ऍप्लिकेशन प्रमाणेच तुमच्या Facebook profile च्या वापराची परवानगी मागेल. ती त्या फेसबूक application ला द्या.(खाली दिलेले चित्र बघा म्हणजे तुम्हाला कळेल नेमके काय करायचे आहे ते)


३)त्या नंतर जे पान उघडेल त्या वर Start Recording पर्यांयावर टिचकी द्या.


४)Adobe Flash Player Settings  मध्ये Allow वर टिचकी द्या.


५)आता खाली चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे पर्यांय दाखवणारे पान उघडेल.त्यातील लाल रंगाच्या बटनावर तुमचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी टिचकी द्या.(त्या आधी तुमचा माईक संगणकाला जोडायला विसरू नका.)


६) या फेसबूक application मध्ये तुम्ही २० सेकंदाचा संदेश फुकटामध्ये रेकॉर्ड करू शकता.

७)एकदा का तुमचा संदेश रेकॉर्ड करून झाला की त्या नंतर
Publish  वर टिचकी द्या.


८)असे केल्याने जी नविन विंडो तुमच्या संगणकाच्या पडद्यावर उघडेल ती खालील प्रमाणे दिसेल.
                        
९)त्यात तुमच्या संदेशाचे नाव व इतर काही समाविष्ट करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता,यानंतर जर तुम्हाला ते एखाद्या मित्राला पाठवायचे असेल तर त्यासाठी Send to a Friend या पर्यांयाचा वापर करा.
     
१०)Friend Selection मध्ये हव्या त्या मित्राचे नाव सर्च करून त्याना तुम्ही तो Voice Messages पाठवू शकता.
                       
                             
११)योग्य ते नाव निवडून झाल्यावर शेवटी Save & Publish वर टिचकी द्या.
             
१२)आता जे जे सांगितले ते करून पाहा....आणि फेसबूक वर स्वत:च्या आवाजा मध्ये Voice Messages पाठवून मित्रपरिवाराला चकित करा.

या सारख्याच अधिक तंत्र-मंत्रां विषयी जाणून घेण्यासाठी फेसबूक वरचे पान Like करायला विसरू नका.



धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

4 comments:

  1. नमस्कार प्रशांत

    फेसबुकवर आपल्या ब्लाँगचे पान कसे टाकायचे याची माहीती द्यावी.

    विवेक तवटे

    ReplyDelete
  2. मि. प्रशांतराव मला मराठी फेसबूक आणि त्यामधील बोलणारा खूपच आवडला.

    ReplyDelete
  3. prashant kharach tu net guru aahes... thanks

    ReplyDelete