नमस्कार मंडळी,ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या विभागामध्ये आपण आता पर्यंत बर्याच युक्त्या जाणून घेतल्या,ज्याना या आधीचे लेख वाचायचे असतील ते "ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र" या विभागाचा वापर करू शकतात.
आज आपण तुमची स्वत:ची Forum (चर्चापीठ) कशी बनवाल? याची माहिती करून घेणार आहोत..सोप्प्या पद्धतीने सुरुवात करून कठीण पद्धत अधिक सोप्या शब्दात सांगण्याचा माझा प्रयत्न राहिल.तुम्ही हे चर्चापीठ स्वत:साठी मर्यादीत ठेवू शकता अथवा तुमच्या ब्लॉग मध्ये सुद्धा समाविष्ट करू शकता.त्यासाठी तुमचा स्वत:चा ब्लॉग(अनुदिनी) असणे गरजेचे आहे असे मुळीच नाही.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
free-forum
२)जे नविन पान उघडेल त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे "Create a free blog" आणि " Create a free forum" असे दोन पर्यांय दिसतील.
३) त्यातील "Create a free forum" या पर्यांयावर टिचकी द्या.
४)असे केल्यावर खालील चित्रामध्ये दर्शविल्या प्रमाणे तुम्हाला विविध आकृतीबंध(Template) निवडता येतील.
५)योग्य त्या आकृतीबंधाचा स्विकार केल्या नंतर तुम्ही तुम्ही पानच्या तळाला असलेल्या CONTINUE या पर्यांयावर टिचकी द्या.
६)आता उघडलेल्या पानावर तुम्हाला तुमच्या चर्चापीठा विषयीची संपुर्ण माहिती भरून परत एकदा CONTINUE वर टिचकी द्यावी लागेल.
७)पाहिलेत फक्त ५ मिनिटाच्या कालावधी मध्ये तुमची Forum (चर्चापीठ) तयार झाली.
८)आता तुमच्या चर्चापीठाची संपुर्ण माहिती तुम्हाला तुम्ही दिलेल्या इ-पत्यावर येईल.
९)तुम्ही तुमचे यूजरनेम आणि पासवर्ड वापरून तुमच्या चर्चापीठामध्ये योग्य ते बदल करू शकता.
१०)जर तुम्हाला पुढे-मागे हे चर्चापीठ नष्ट करायचे असेल तर खाली दिलेला पर्यांय वापरा
Administration Panel > General Admin > Forum deletion > Delete
११)डेमो पाहण्यासाठी या लिंकचा वापर करा.
डेमो
हा फक्त डेमो आहे,
माझ्या स्वत:च्या चर्चापीठाचा दुवा
अजुन बरेच पर्यांय उपलब्ध आहेत,
त्यांची माहिती आपण हळूहळू पुढच्या भागात पाहू.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

0 comments:
Post a Comment