मंडळी आजच मला माझ्या अनुदिनीचे वाचक विवेक यांनी फेसबूक वर आपल्या ब्लॉगचे पान कसे तयार करायचे याची माहिती विचारली.त्यासाठी आजचा लेख लिहित आहे.
तुमच्या अनुदिनीचे(Blog चे) फेसबूक वरचे पान कसे तयार कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबूक प्रोफाईल वर लॉग-इन व्हा
२)तुम्हाला आधी तुमचे फेसबूक पान तयार करावे लागेल,त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.
३)असे केल्याने तुम्हाला खालील पर्यांय दिसू लागतील.
त्यातील योग्य त्या पर्यांयाची निवड करा..
उदा. मी इथे Cause or Community हा शेवटचा पर्यांय निवडला.
त्यानंतर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Community चे नाव निवडून I agree to Facebook Pages Terms या पर्यांया समोर टिचकी देवून झाल्यावर तुमचे पान तयार होईल.
४)आता त्या पानावर आवश्यक ती माहिती भरा..या नंतर तुमचे फेसबूक पान तुमच्या अनुदिनीवर दाखवता यावे यासाठी चित्रामध्ये दर्शविल्या प्रमाणे तुमच्या फेसबूक पानावरील पर्यांय क्रमांक ५ ची निवड करा.
५)यातील Add Like Box वर टिचकी द्या.
६)असे केल्याने एक नविन पान उघडेल.
त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे तुमच्या Facebook Page URL चा पत्ता कॉपी करून पेस्ट करा.त्या नंतर Get Code या पर्यांयावर टिचकी द्या.
७)असे केल्यावर तुम्हाला खालील चित्रा प्रमाणे कोड दाखवणारी विंडो उघडलेली दिसेल, त्यातील पहिले iframe कोड नोट्पॅड मध्ये कॉपी करून घ्या.
८)आता ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.
९)या नंतर Add a Gadget वर टिचकी द्या.
१०)आता विविध पर्यांयां पैकी HTML/JavaScript हा पर्यांय निवडा.
११)आता आपण जे iframe कोड नोट्पॅड मध्ये सेव्ह केले होते ते या ठिकाणी पेस्ट करा आणि मग सेव्ह वर टिचकी द्या(चित्र पहा.)
१२)या पायर्या तुम्ही नीट पार केल्यात तर तुम्हाला तुमच्या अनुदिनीचे पान तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये खालील प्रमाणे दिसू लागेल.
प्रशांत रेडकर सोबत फेसबूक वरचे पान
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
धन्यवाद प्रशांत.
ReplyDeleteतुज्या ह्या टीप चा उपयोग झाला.
धन्यवाद :-),मराठी ब्लॉगिंगमध्ये अधिकाधिक सुंदर,दर्जेदार ब्लॉग निर्माण व्हावे यासाठी "ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र" विभाग सुरु करण्याचा माझा हेतू होता..तो हळूहळू साध्य होतो आहे..तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
ReplyDeleteसर ५ नंबर चे ऑप्शन नाही ये मी काय करू
ReplyDelete