मंडळी तुम्ही जर फेसबूक वापरत असाल..तर ते या पुढे तुम्हाला मराठी मध्ये वापरणे सुद्धा शक्य होणार आहे..त्यासाठी फेसबूक ने नविन सुविधा दिलेली आहे..त्याशिवाय तुम्ही सुद्धा फेसबूकला मराठी मध्ये बदलण्यासाठी मदत करू शकता.
हे कसे कराल?
१)प्रथम तुमच्या फेसबूक खात्यावर तुमचा परवलीचा शब्द वापरून लॉग-इन व्हा.
२)तिथे तुम्हाला चॅट विंडोच्या बाजुला Translations नावाचा पर्यांय दिसेल. त्या वर टिचकी द्या.
३)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉप-डाऊन मेनू मध्ये जावून मराठीचा पर्यांय निवडा.
४)तुम्ही फेसबूक मराठी मध्ये बदलण्यासाठी मदत करू शकता,त्यासाठी Translation App या पर्यांयावर टिचकी द्या.
५)असे केल्याने एक नविन पान उघडेल.ते खालील चित्राप्रमाणे दिसेल.
६)तुम्ही नविन असल्याने तुम्हाला प्रथम डाव्याबाजुला असलेल्या मेनू मधून Vote हा पर्यांय निवडावा लागेल.
७)असे केल्यावर तुम्हाला इंग्रजी शब्द,वाक्य आणि त्याखाली त्याचे मराठी भाषांतर केलेल दिसेल. ते योग्य वाटले तर "^" वर टिचकी द्या. असे केल्यावर ते चिन्ह हिरव्या रंगा मध्ये बदलेल..जर तुम्हाला भाषांतर चुकीचे वाटत असेल तर "v" वर टिचकी द्या असे केल्यावर ते चिन्ह लाल रंगामध्ये बदलेल.
८)जर तुम्हाला त्या वाक्याचे योग्य भाषांतर माहित असेल तर
Translate पर्यांया वर टिचकी द्या. आणि योग्य ते बदल करा.
९)एकदा का तुम्ही ही पहिली पायरी पुर्ण केलीत की फेसबूक कडून तुम्हाला अधिक मोठे बदल करण्याची परवानगी मिळेल.
१०) इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द शोधायचे असतील तर खाली दिलेल्या लेखाचा वापर करा
"इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द कसे शोधाल?"
आणि फेसबूकला जलद गतीने मराठी मध्ये बदलण्यासाठी मदत करा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment