धन्यवाद मित्रमैत्रिणींनो,
आजचा दिवस तसा गडबडीमध्ये गेला पण दोन चांगल्या बातम्या कळल्या ते म्हणजे
१)माझ्या अनुदिनीची IndiRank वधारली..७१ वरून ७३ वर पोचली.Alexa rank ४.३४M वरून २.२२M वर आली (Alexa rank जितकी कमी तितकी जास्त चांगले असते)२ महिन्यापासून रोज लिहितो आहे,त्याला तुमचा प्रतिसाद मिळतो आहे त्या बद्दल मनापासून आभार.
२)आजच मला नासा कडून त्यांच्या मिशनमध्ये स्वत:चे नाव आणि फोटो पाठवून सहभागी झाल्याबद्दल
प्रशस्तीपत्रक मिळाले..आता २०१२ मध्ये काही ही होऊ दे,माझे नाव आणि फोटो अवकाशात गेला.
प्रशस्तीपत्रक मिळाले..आता २०१२ मध्ये काही ही होऊ दे,माझे नाव आणि फोटो अवकाशात गेला.
एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते ते म्हणजे अनोळखी वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला,पण ओळखीच्या मित्रपरिवाराने काय मराठी अनुदिनी लिहितोस,जाहिरात करतोस का ब्लॉगची असे म्हणून हेटाळणी केली.या दोन्ही गोष्टी माझ्या उत्साह वाढवणार्याच ठरल्या.
मी यापुढे ही उत्तम लिहिण्याचा प्रयत्न करीन,अजुनही शिकतो आहे.चुका होतीलच,सांभाळून घ्या.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment