तुम्हाला माहित असेलच की तुम्ही जेव्हा एखादे अकांऊन्ट बनवता,अथवा अनोळखी लिंक पोस्ट करता तेव्हा तुम्हाला काही शब्द आणि संख्या एकत्र टाईप करून इंटर करावे लागते,हा कोड चित्रा मध्ये दिसणार्या कोड सोबत तंतोतंत जुळला तरच तुम्ही काही लिंक पोस्ट करू शकता,लॉग-इन करू शकता.याला CAPTCHA असे म्हणतात.
ही प्रणाली काही स्वयंचलित सॉफ्ट्वेअर प्रोग्राम ज्याना bots असे म्हणतात त्याना रोकण्यासाठी असते,जी अश्या सॉफ्ट्वेअर प्रोग्राम पासून तुमचे अकांउन्ट हॅक होण्यापासून संरक्षण देते.
तरीही हॅकर्स बर्यास युक्ता वापरून या प्रणाली वर मात करत असतात.
या पासून संरक्षण मिळावे यासाठी फेसबूकने आपल्या सुरक्षाप्रणाली मध्ये बदल करून,आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे..ते म्हणजे "social authentication"
यापुढे फेसबूक वर लॉग-इन करताना अथवा लिंक पोस्ट करताना जुन्या पध्दतीचे captcha कोड दिसणार नाहित त्या ऐंवजी तुम्हाला तुमच्या मित्रपरिवारातील काही मित्रांचे चेहरे दाखवले जातील आणि मग तुम्हाला त्या चेहर्याचे योग्य नाव ओळखून Submit करावे लागेल,तरच तुमच्या खात्याचा खरेपणा सिद्ध होईल.यालाच "social authentication" असे म्हणतात.
ही पद्धत जास्त सुरक्षित आहे..कारण हॅकर ना तुमच्या खात्याचा पासवर्ड कळू शकतो,पण तुमच्या मित्रांचे चेहरे आणि नावे नाहित. :-)
अजुनही ही सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरु आहे..लवकरच ती
वापरात येईल.
अधिक माहिती साठी फ़ेसबूकच्या ब्लॉग वरचा हा लेख वाचावा.
धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment