५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

१० फेसबूक privacy settings ज्या प्रत्येकाला माहित असायलाच पाहिजे.

सध्या फेसबूकचा वापर खुपच वाढला आहे,नेट म्हटले की धोके हे आलेच..इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आपण या आधीच्या लेखामध्ये पाहिले आहे..आज आपण फेसबूक privacy settings  ची माहिती करून घेणार आहोत. अश्या १० privacy settings ज्या प्रत्येक युजरने करणे गरजेचे आहे.
त्या खालील प्रमाणे आहेत:

 
१)Sharing on Facebook:

Account > Privacy Settings > Sharing on Facebook हा पर्यांय वापरून तुम्ही त्या बदलू शकता.
                                            
 कोणा बरोबर काय शेअर करावे आणि कितपत शेअर करावे याचा निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे. फेसबूकने याची निवड करणे तुमच्या साठी सोप्पे केले आहे.तुम्ही वरील पर्यांय वापरून तुमची माहिती Everyone, Friends of Friends, or Friends only या पैकी योग्य तो पर्यांय वापरून मर्यांदीत करू शकता.

हे बदल करून झाल्या वर ते योग्य प्रकारे लागू झाले का?हे पाहण्यासाठी तुम्ही Preview my Profile हा पर्यांय वापरून तुम्ही तुम्चही माहिती एखाद्या व्यक्तीला कशी दिसते? याची चाचपणी घेवू शकता.

२)Existing Photos:

Account > Privacy Settings > Sharing on Facebook > Customize Settings > Edit album privacy for existing photos
                    

हा पर्यांय वापरून तुम्ही तुमचे फोटो आणि अल्बम कोणासोबत कितपत शेअर करायचे ते ठरवू शकता.
                               
३)Checking In to Places:

Account > Privacy Settings > Sharing on Facebook > Customize Settings > Friends can check me in to Places

हा पर्यांय वापरून तुम्ही ही Setting बदलू शकता..खरे तर तुमच्या मित्रांना तुम्ही आता कुठे आहात ते कळावे यासाठी हा पर्यांय आहे, पण त्या व्यतिरिक्त फेसबूक वरील अनोळखी व्यक्तीला ते कळणे धोकादायक ठरू शकते. तुम्हाला जर ते कोणालाच कळू द्यायचे नसेल तर तुम्ही ही सेवा पुर्णपणे disable करू शकता.

४)Connecting on Facebook:


Account > Privacy Settings > Connecting on Facebook
   
photo, gender, age, education, hometown इत्यादीची माहिती कोणासोबत आणि कितपत शेअर करायची हे ठरवण्यासाठी तुम्ही वरील पर्यांय वापरून योग्य ते बदल करू शकता.Friends Only, Friends of Friends, Everyone असे पर्यांय उपलब्ध तर आहेतच त्या शिवाय customize  वर टिचकी देऊन तुम्ही तुम्हाला हवे तसे बदल पण करू शकता.

५)Apps You Use:

Account > Privacy Settings > Apps and Websites > Apps You Use 
या पर्यांयाचा वापर करून तुम्ही या Settings बदलू शकता.कधी कधी तुम्ही फेसबूक वर काही खेळ अथवा apps वापरायला सुरुवात करता आणि काही काळाने विसरता, तरी देखिल तुम्हाला त्या विषयीची माहिती रोज तुमच्या वॉल वर दिसत राहते. तुम्ही हे सर्व थांबवू शकता.

"Remove" unwanted or spammy apps. पर्यांय वापरून एक तर तुम्ही त्या ठराविक Apps साठी बदलू शकता अथवा "Turn off" all platform apps. चा वापर करून कायम साठी बंद करू शकता.

६)Instant Personalization:

     तुमची खाजगी माहिती त्रयस्थ वेबसाईटला या मार्फत पुरवली जाते. तुम्ही थांबवू शकता. त्या साठी Instant Personalization समोरील Edit Settings या पर्यांयावर टिचकी द्या.
खाली चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे एक व्हिडिओ दर्शवणारी खिडकी(विंडो) दिसेल...ती Close वर टिचकी द्या आणि बंद करा.
          
पुढील पानावर Enable instant personalization on partner websites हा पर्यांय दिसेल त्या समोरील टिक काढून टाका(uncheck)
तसे केल्यावर खाली चित्रामध्ये दिसतो तसा संदेश दिसेल.त्यातील Confirm वर टिचकी द्या.


७)Info accessible through your friends:

Account > Privacy Settings > Apps and Websites > Info accessible through your friends
ही फेसबूक ची privacy settings खुप खुबीने वापरली गेली आहे,ही Setting जर तुम्ही योग्य प्रकारे बदलली नाहित तर,तुम्ही तुमच्या इतर Settings किती ही बदला तरी तुम्ही तुमची खाजगी माहिती तुमच्या मित्रपरिवारा द्वारे Apps आणि Websites सोबत शेअर होवू शकते.
या Settings  मध्ये योग्य पर्यांयांची निवड करून तुम्ही त्या गोष्टीवर नियंत्रण मिळवू शकता.

८)Public Search:
Account > Privacy Settings > Apps and Websites > Public Search

        
                 
तुम्हाला याची माहिती नसेल,पण तुमचे फेसबूक प्रोफाईल महत्वाच्या सर्च इंजिन मध्ये नोंदविलेले असते.  हा
पर्यांय वापरून तुम्ही तुमचे पब्लिक प्रोफाईल सर्च मध्ये सापडणार नाही अशी सोय करू शकता.

९)Friend Lists:
Friends > Edit Friends > Create a List

 
  
                       
तुमच्या Friend Lists मध्ये ५००० Friends आहेत...आता यातल्या प्रत्येक व्यक्ती सोबत तर तुम्ही सर्व गोष्टी शेअर नाही करणार..मग तुमच्या ठराविक मित्र-मैत्रिणींची एक लिस्ट बनवून त्या त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही तुमच्या खाजगी बाबी कितपत शेअर करायच्या ते ठरवू शकता.

१०)Enabling HTTPS:

शेवटचे पण खुप महत्वाचे फेअबूक वर लॉग-इन करताना कायम HTTPS प्रोटोकॉलचा वापर करा.
Account > Account Settings > Account Security > Secure Browsing (HTTPS)
हा पर्यांय वापरून तुम्ही ते सहज करू शकता.


तुम्हाला अश्या विविध विषयाची माहिती नेहमी हवी असेल. तर खालील फेसबूक पानावर लाईक वर टिचकी देवून तुम्ही नेहमी पोस्ट अपडेट्स मिळवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र.
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment