५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

चॅट करताना कोण invisible आणि कोणी तुम्हाला Blocked केले ते कसे शोधाल?


मित्रांनो आज आपण Google chat/Gtalk वर कोण invisible आहे आणि कोणी तुम्हाला ब्लॉक केले आहे हे कसे शोधावे याची माहिती करून घेणार आहोत.ही पद्धत वापरून तुम्हाला याची माहिती मिळेल की तुमच्या कोणत्या मित्र-मैत्रीणींनी तुम्हाला ब्लॉक केले आहे.

बर्‍याच वेळा असे होते की काही काळाने तुम्हाला असे आढळते की तुमच्या Google chat/Gtalk मधील एखादी व्यक्ती बरेच दिवस ऑनलाइन दिसत नाही आहे,याचा अर्थ एकच एक तर ती व्यक्ती ऑफलाइन आहे अथवा त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे.

हे कसे शोधावे?



त्या साठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा.

१)प्रथम खाली दिलेल्या लिंक वरून Pidgin नावाचे chat client plugin डाउनलोड करा.


Download pidgin

२)त्यानंतर ते तुमच्या संगणकावर Install करा.

३)आता ते तुम्हाला Gtalk साठी Configure  करावे लागेल.
त्यासाठी Add  वर टिचकी द्या.....हिच कृती तुम्ही Accounts -> Manage Account  मध्ये जावून सुद्धा करू शकता.
      
                               
४)तुमचे Account एकदा का तुम्ही Add केले की तुम्हाला खाली चित्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे Basic आणि Advance टॅब वर टिचकी देवून बदल करावे लागतील.

५) एकदा का या settings निट झाल्या की तुम्ही Gtalk ला कनेक्ट होवू शकता.

आता तुम्हाला कोणी ब्लॉक केले हे तुम्ही कसे शोधाल?

जेव्हा तुम्हाला कोणी Gtalk वर ब्लॉक केलेले असते तेव्हा ते तुम्हाला कायम ऑफलाइन दिसतात.आता ते खरेच ऑफलाइन आहेत की त्यांनी तुम्हाला ब्लॉक केले आहे हे शोधण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर Right click करा आणि Get Info पर्यांयावर टिचकी द्या.
                 
खाली दिलेली चित्रात्मक तुलना पाहून तुम्हाला कळेल की कोण खरच ऑफलाईन आहे आणि कोणी तुम्हाला ब्लॉक केले आहे.
                                 
                                                    
जर एखादी व्यक्ती खरच ऑफलाइन असेल तर तिची माहिती तुम्हाला Buddy Information मध्ये दिसेल.
जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर त्या व्यक्तीची माहिती तुम्हाला Buddy Information मध्ये दिसणार नाही.

जीमेल टिप्स-ट्रिक्स साठी तुम्ही खालील विभाग पाहू शकता
जीमेल टिप्स-ट्रिक्स

Clicksia

धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment