५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या संगणकासाठी मोफत Firewall सॉफ्टवेअर कसे मिळवाल?


आपण मागच्या लेखात पाहिले की "तुमच्या संगणकासाठी मोफत Antivirus सॉफ्टवेअर कसे मिळवाल?"

आज आपण तुमच्या संगणकासाठी मोफत Firewall सॉफ्टवेअर कसे मिळवाल? याची माहिती करून घेणार आहोत.

Firewall म्हणजे काय?
Firewall हे असे सॉफ्टवेअर असते ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून येणार्‍या आणि तुमच्या संगणकावरून इंटरनेट वर जाणार्‍या माहितीवर नियंत्रण ठेवू शकता.याने तुमच्या संगणकावरील माहितीची सुरक्षितता वाढते.कारण
Spyware,bots,keyloggers,trojan horses,worms इत्यादी नेटवर असलेल्या असुरक्षित संगणकातील माहिती चोरून ती "रिमोट सर्व्हर" वर पाठवतात.

खाली काही मोफत Firewall सॉफ्टवेअर  आहेत ती वापरून तुम्ही तुमचा संगणक अधिक सुरक्षित ठेवू शकता.



१)ZoneAlarm free Firewall:
                          
                            
ZoneAlarm हे एक जुने आणि विश्वासू Firewall सॉफ्टवेअर  आहे.AVG  सारख्या मोफत Antivirus सॉफ्टवेअर सोबत त्याचा वापर केल्यास तुमच्या संगणकाची सुरक्षितता अधिक वाढेल.याचा वापर करून तुम्ही नको असलेले प्रोग्राम्स ब्लॉक करू शकता आणि network activity वर नियंत्रण ठेवू शकता.


खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.

ZoneAlarm free Firewall


२)Outpost free Firewall:

हे सुद्धा एक उत्तम मोफत Firewall सॉफ्टवेअर आहे. घरगुती वापरासाठी उपयुक्त आहे.ते प्रत्येक Windows applications वर लक्ष ठेवते आणि त्यांनी इंटरनेटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास,त्याना तशी परवानगी द्यावी की नाही,याची तुमच्याकडे विचारणा करते.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.

Outpost free Firewall


३)Ashampoo Firewall:

या फायरवॉल सॉफ्टवेअरमध्ये system monitor,IP Spam blocker आणि Internet trace cleaner यासारख्या सुविधा आहेत.

खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.
Ashampoo Firewall


४)PC Tools free Firewall:
                     

                                                
या Firewall सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा वर दिलेल्या प्रमाणे सर्व सुविधा आहेत.
खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही ते मोफत डाऊनलोड करू शकता.
PC Tools free Firewall

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment