५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचे Deactivate / Delete केलेले फेसबूक अकाउंट परत कसे मिळवाल?


तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete कसे कराल? हे आपण मागील लेखात जाणून घेतले,आता आपण, तुमचे Deactivate / Delete केलेले फेसबूक अकाउंट परत कसे मिळवाल? याची माहिती करून घेणार आहोत.


हे कसे कराल?



१)प्रथम https://www.facebook.com/ वर जा.

२)या साईट वर लॉग-इन होण्यासाठी तुम्ही पुर्वी जो इमेल आणि पासवर्ड वापरत होतात तो वापरून लॉग-इन व्हा.

३)याआधी जो इमेल वापरत होतात तोच वापरा कारण तुमचे जुने अकाउंट परत सुरु करण्यासाठीचा confirmation email  तुम्हाला फेसबूक वरून त्याच इमेल वर पाठवला जाईल.

४)आता तुमच्या इमेल अकाउंट वर लॉग-इन व्हा.

५)तुमच्या इमेल अकाउंटच्या इनबॉक्स मध्ये फेसबूक कडून एक मेल आलेला असेल,तो उघडा.

६)त्या मधील confirmation लिंक वर टिचकी द्या.

७)असे केल्यावर तुम्हाला तुमच्या फेसबूकच्या होमपेज उघडताना दिसेल आणि परत तुम्ही तुमचे फेसबूक अकाउंट वापरू लागाल.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
प्रशांत रेडकर सोबत फेसबूक वरचे पान
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment