मागच्या भागात आपण "फेसबूकचे तंत्र-मंत्र" मध्ये "१० फेसबूक privacy settings ज्या प्रत्येकाला माहित असायलाच पाहिजे." याची माहिती करून घेतली.आज आपण तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete कसे कराल? याची माहिती करून घेणार आहोत.
फेसबूक हे जनसंपर्काचे प्रभावी माध्यम आहे,एकदा का तुम्ही फेसबूक अकाउंट बनवले की त्यात तुम्ही ५००० मर्यांदे पर्यंत मित्र-मैत्रिणी जोडू शकता.पण समजा तुम्हाला या सोशल नेटवर्किगचा कंटाळा आला.तर तुम्ही तुमचे फेसबूक अकाउंट Deactivate / Delete करून हे सर्व संपवू शकता.
१)तुमच्या फेसबूक अकाउंट वर लॉग-इन व्हा.
२)तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला उजव्या कोपर्याला ‘Account’ नावाचा पर्यांय दिसेल,त्यातील ‘Account Settings’ मध्ये जावून Deactivate Account समोरील Deactivate वर टिचकी द्या.
३)असे केल्यावर फेसबूक कडून तुम्हाला अकाउंट Deactivate करण्याचे कारण विचरले जाईल.एकतर तुम्ही दिलेल्या पर्यांयातून एक निवडा अथवा स्वत:चे कारण काय ते सांगा.
४)कारण लिहून झाल्यावर Deactivate Button वर टिचकी द्या.
५)असे केल्यावर तुम्हाला confirmation चे पान दिसेल ज्यावर तुम्हाला परत एकदा खरेच तुम्हाला तुमचे फेसबूक अकाउंट terminate करायचे आहे का?असे विचारले जाईल.
पुढच्या लेखात आपण "तुमचे Deactivate / Delete केलेले फेसबूक अकाउंट परत कसे मिळवाल?" याची माहिती करून घेणार आहोत.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
mala fecebook var marathi typing karayache aahe
ReplyDeletehttp://www.google.com/transliterate/marathi चा वापर करा अथवा माझ्या साईट वरील मराठी लिहा हा दुवा वापरा
ReplyDelete