नमस्कार,
तुमचा ब्लॉग ब्राउजरमध्ये मध्ये दिसतो कसा हे तुम्ही या आधी "तुमचा ब्लॉग जगभर दिसतो कसा ते कसे पाहाल?" या लेखात पाहिले.आज आपण पाहणार आहोत,तुमचा ब्लॉग ब्राउजरमध्ये उघडायला किती वेळ घेतो?
तुमचा ब्लॉग इंटरनेट ब्राउजर मधून पाहताना किती वेळ लागतो,त्यावर सुद्धा तुमच्या ब्लॉगची वाचकसंख्या अवलंबून आहे,कारण जर तुमचा ब्लॉग ब्राउजरमध्ये उघडायला जास्त वेळ घेत असेल तर वाचक कंटाळून जातात.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेली लिंक वर टिचकी द्या
speedtester
२)जे नविन पान उघडेल त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे
तुमच्या ब्लॉग अथवा साईट चा पत्ता द्या आणि Captcha कोड टाकून,Submit वर टिचकी द्या.
३)लवकरच एक नविन पान उघडेल.त्यात तुमच्या ब्लॉगचे सविस्तर विश्लेषण केलेले तुम्हाला दिसेल
४)चित्रा मध्ये दाखविल्या प्रमाणे तुमच्या ब्लॉगचा Average Speed(तुमचा ब्लॉग दिसायला साधारण किती वेळ लागतो ती माहिती),तुमच्या ब्लॉगच्या मुख्य पानाची साईज,मोडेम अथवा ब्रॉडबॅन्ड नेट वर त्याला लोड होण्यासाठी नेमका किती वेळ लागतो याची माहिती मिळेलच.
त्या शिवाय तुमच्या ब्लॉग मध्ये किती JavaScript आहेत,किती चित्र पहिल्या पानामध्ये आहेत,याची माहिती तुम्हाला मिळते.
त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या ब्राउजर मध्ये उघडण्याच्या गती मध्ये सुधारणा करू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment