ब्लॉग पोस्ट मराठी मधून लिहिणे आता अधिक सोप्पे झाले आहे, त्यासाठी तुम्हाला आता वेगळ्या सॉफ्ट्वेअरची गरज नाही. १६ फेब्रुवारी पासून ब्लॉगरने भारतीय भाषांमध्ये मराठीचा समावेश केला आहे. त्यामुळे मराठी टाईप करणे झाले अधिक सोप्पे.मराठी शिवाय संस्कृतचा सुद्धा या मध्ये समावेश आहे.
ही सेवा वापरता यावी यासाठी खाली दिलेले बदल करावे लागतील.
प्रथम तुमच्या ब्लॉगच्या Settings मध्ये जावून Basic settings मध्ये चित्रामध्ये दिल्या प्रमाणे बदल करा.
शेवटी Settings सेव्ह करायाला विसरू नका.
आता तुम्ही सहज मराठी मध्ये लिहू शकाल.
तळटीप: जर तुमच्या ब्लॉगच्या Settings मध्ये हे पर्याय दिसत नसतील, तर या पुढे
http://draft.blogger.com/ चा वापर करा..कारण याच ठिकाणी blogger .com च्या नवीन सेवा प्रथम उपलब्ध करून दिल्या जातात.
धन्यवाद,
तुमचा मित्र ,
प्रशांत दा. रेडकर
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment